घरमहाराष्ट्रWeather Alert: येत्या २४ तासात अती मुसळधार पावसाची शक्यता!

Weather Alert: येत्या २४ तासात अती मुसळधार पावसाची शक्यता!

Subscribe

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार येत्या २४ तासात घाट भागात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, गोव्याच्या डॉपलर रडार प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा, कोकण व घाट भागात दाट ढग दर्शवत आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार येत्या २४ तासात घाट भागात (सातारा, पुणे) अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पूर परिस्थितीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर येत्या ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने पुणे आणि सातारा भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येते काही दिवस पाऊस कायम राहणार आहे.

- Advertisement -

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, कोयना, राधानगरी परिसरात सुरू असलेला पाऊस आणखी दोन दिवस असाच सुरू राहणार असून पुण्यातही घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ तारखेपर्यंत कोकण-मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस असणार आहे तर २५ तारखेपर्यंत महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -