Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी हिंगोलीत पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्क तुटला

हिंगोलीत पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्क तुटला

Subscribe

राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोराचा वारा आणि मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांत मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोराचा वारा आणि मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांत मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. (Heavy Rain Hingoli District Flood In Many Villages)

मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके रस्त्यावरील मधुमती नदीला आलेल्या पुरामुळे रात्रीपासून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. परिणामी या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच काही नागरिक पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून धोकादायक प्रवास करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. एकीकडे जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.

- Advertisement -

शेतातील पिके पावसाच्या पाण्याखाली बुडून गेली आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार होता, तर काही शेतकऱ्यांनी पेरलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेले. ज्या शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली होती. त्यांची पिके मुसळधार पावसामुळे उगवलीच नाहीत. अशा एक ना अनेक संकटाचा सामना यावर्षी शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तसंच ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नसून काळोख निर्माण झाला आहे. राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आजही मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – वसईत दरड कोसळली; चार जणांची सुटका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -