घर ताज्या घडामोडी मुसळधार पावसाचा मुंबई परिसराला तडाखा, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुसळधार पावसाचा मुंबई परिसराला तडाखा, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा मुंबईला बसला आहे. काल रात्रीपासूनच शहरात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होत आहे. काल (सोमवार) सकाळपासून पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे आज पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यभरातील मुसळधार पावसामुळे मुंबईतील मरीन ड्राइव्हला भरती-ओहोटी आली आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई, नवीन मुंबई, ठाणे, पालघर या भागात ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पालघरमध्येही पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे समुद्रात वादळ सदृश्यस्थिती निर्माण झाली असून तुफानी लाट उसळत आहेत. या परिस्थितीत मच्छिमारीसाठी बेटीने समुद्रात गेलेल्या मच्छिमार बांधवांच्या घरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघर प्रशासनाकडून समुद्र किनारी राहणाऱ्या या मच्छीमार बांधवांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या इशाऱ्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे दीड हजार बोटी आजही समुद्रात असल्याची माहिती आहे.


हेही वाचा : राज्यात पावसाची दमदार बॅडिंग; कोकणासह मुंबईत वादळी वाऱ्यासह संततधार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -