घरठाणेठाण्यात कोसळधार, टेरेसवरील शेडचे लोखंडी पत्रे उडाले

ठाण्यात कोसळधार, टेरेसवरील शेडचे लोखंडी पत्रे उडाले

Subscribe

खारकर आळी परिसरातील सात मजली चित्रा टॉवर या इमारतीच्या टेरेसवरील शेडचे लोखंडी पत्रे उडल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजून ६ मिनिटांच्या सुमारास समोर आली. उडालेले पत्रे जवळच्या इमारतीवरती पडल्याने मोठा आवाज झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

चित्रा टॉवर खारकर आळी परिसरात हा एन.के.टी. कॉलेज जवळ, शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला आहे. ही इमारत तळ आणि सात मजली असून त्याच्या लोखंडी पत्रे टाकण्यात आले आहेत. तेच पत्रे मंगळवारी सकाळी उडून बाजूच्या इमारतीवर पडले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित होते.चित्रा इमारतीच्या टेरेसवरील पडलेले पत्रे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर यशस्वीरित्या काढण्यात आले आहेत. या घटनेत कोणतीही जीवित नाही, कोणालाही दुखापत झालेली नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

- Advertisement -

राबोडीत घराचा काही भाग पडला

राबोडी-१ येथील लोडबेरींग केलेल्या घराचा काही भाग पडल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या सुमारास समोर आली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

राबोडी १ परिसरातील कत्तल खाना रोड, रेहमद नगर येथे सईदा सलीम कुरेशी यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजली लोडबेरींगचे घर आहे. त्या घराचा काही भाग पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-पिकअप वाहन व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (उथळसर प्रभाग समिती) या विभागाने धाव घेतली. तसेच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -