घरमहाराष्ट्रमुंबई,कोकणासह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

मुंबई,कोकणासह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Subscribe

मुंबई – काही तासांपासून मुंबई, कोकण आणि राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने 4 ते 5 दिवसात राज्यातील विदर्भ, कोकणात आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विभागाच्या विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील 5 दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत गेल्या काही तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमावारी दिवसभर मुंबईत पावसाच्या रिमझीम सरी कोसळत होत्या. मध्यरात्रींच्या सुमारास पावसाने उघडीप दिली. मात्र, पहाटे 5 वाजल्यापासून संपूर्ण मुंबई शहरात जोरदार पाऊस सुरू झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे बंद झाला आहे.

- Advertisement -

पाणी साचण्याची शक्यता –

मुसळधार पाऊस सुरू राहील्यास पश्चिम उपनगरांत सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. कुर्ल्यात मागील एका तासात 39 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर चेंबूरमध्ये देखील धुवांधार पाऊस कोसळत आहे. चेंबुरमध्ये मागील एका तासात 32 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा –

दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्याती काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून पुढचे काही दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईसह कोकण किनापट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा –

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत. पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागानं केलं आहे.

मराठवाड्यासाठी आरेंज अलर्ट –

मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -