Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस; पालघर, नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल

राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस; पालघर, नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल

Subscribe

एकीकडे सर्वत्र होळीचा उत्साह असताना राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे. पालघर, नाशिक, बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटाने पाऊस झाला. यामुळे शेती भागाचं नुकसान झालं असून अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

पालघरच्या वाडा, विक्रमगड, जव्हारसह अनेकभागात रात्री मुसळधार पाऊस झाला. हा भाग बहुतांश शेतीभाग असल्याने येथील शेतकरी, बागायतदार, वीट भट्टी व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तर, आंब्यासह अनेक रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

बुलढाणा जिल्ह्यातही रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. अतिमुसळधार पावसामुळे चिंतातूर असलेला शेतकरी आता अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाच्या सरी बरसल्या.

यंदा हिवाळ्याने लवकर एक्झिट घेतल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात उकाडा वाढला होता. परंतु, होळीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता हवामाने विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ५ ते ८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी हमीभाव मिळत नसल्याने चिंतेत आहेत. कष्टाने पिकवलेले उत्पादन कवडीमोल भावाने विकावे लागत आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता आणखी वाढली आहे. यामुळे रब्बी पिकांना सर्वाधिक धोका आहे. कांदा, गहू आणि हरभरा पिकाला या अवकाळी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही भीती आहे.

- Advertisment -