गडचिरोली जिल्ह्यात ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून गडचिरोली जिल्ह्याला अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून गडचिरोली जिल्ह्याला अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळा, कॉलेज आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे. (Heavy rainfall alert in gadchiroli district of maharashtra)

गेल्या काही दिवसांत गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. त्यापैकी तूमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्याने या परिसरातील लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.

या नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, या भागातील लोक आपला जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातून मोटार सायकल खांद्यावर घेऊन या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करत आहेत. तर दुसरीकडे चंद्रा गावाजवळील नाल्यावरुन देखील पाणी वाहत होते. दरम्यान, पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूर पाऊस

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सखल भाग मुसळधार पावसामुळे जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील जीवती, ,पोंभूर्णा, गोंडपिपरी, वरोरा, मूल या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जलमय स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर पाणीच पाणी आहे. महत्त्वाच्या वाहतूक शाखा टी पॉईंटवर नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा आला आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला ७२ तासांचा रेड अलर्ट दिली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग

गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरुन ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे.

वर्ध्यात जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्यातही सकाळपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. तर वर्धा जिल्ह्यात १० ते १४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज सांगण्यात आला आहे.


हेही वाचा – मनसेला मंत्रीपद मिळाल्यास आमचा विरोध; रामदार आठवलेंची भूमिका