घरमहाराष्ट्रराज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Subscribe

मागील आठवड्यात पावसाने राज्यभरात जोरदार बॅटींग केली. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या पावसाने गेल्या दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या उन-पावसाचा खेळ सुरू आहे.

मागील आठवड्यात पावसाने राज्यभरात जोरदार बॅटींग केली. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या पावसाने गेल्या दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या उन-पावसाचा खेळ सुरू आहे. मात्र असे असले तरी हवामान विभागाकडून राज्यभरात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Heavy rainfall alert in maharashtra for next four days prediction of imd)

हवामान विभागाच्या अंदाजनुसार शनिवार २३ जुलैपासून राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. शिवाय, राज्याच्या मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. मात्र, गुरूवारपासून काही प्रमाणात पावसाचा जोर कमी आला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे.

पावसाच्या योग्य हजेरीमुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास १६ बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. तसेच, जिल्ह्यातील अजूनही १५ बंधारे पाण्याखाली असले, तरी पाणी वेगाने ओसरत असल्याने ते सुद्धा लवकरच मोकळे होतील, अशी चिन्हे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जेईई मेन 2022 चं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाऊनलोड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -