Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाण्यातील चिराक नगर परिसरात मागील 6 तासांत 123 मिमी पावसाची नोंद; मुंबईतही...

ठाण्यातील चिराक नगर परिसरात मागील 6 तासांत 123 मिमी पावसाची नोंद; मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

मुंबईसह ठाण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील चिराक नगर परिसरात 123 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह ठाण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील चिराक नगर परिसरात 123 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ठाण्याच्या चिराक नगर परिसात 123 मिमी, नौपाडा परिसरात 112 मिमी आणि मुंब्रा परिसरात 96.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत जोरदार पावसाने बॅटींग केली आहे. (Heavy Rainfall alert in mumbai and thane by imd)

मुंबईत गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळीही पावसाची संततधार कायम आहे. विजांचा कडकडांट आणि जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाणी साचत असल्याने रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला असून, वाहतुक कोंडी निर्माण होत आहे.

- Advertisement -

ठाण्याच्या सखल भागासह रेल्वे रुळांवरही पाणी साचले आहे. सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरु आहे.

मुंबईत पुढील काही तासांत शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाशासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, उपनगरात तुरळक ठिकाणी अति-मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अधूनमधून तीव्र सरी येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे.


हेही वाचा – काँग्रेसचे नेते रोहित टिळक भाजपच्या वाटेवर? पुण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घेतली गुप्त भेट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -