Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

मागील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने राज्यभरात जोर धरला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला असून नुकसानही झाले आहे.

मागील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने राज्यभरात जोर धरला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला असून नुकसानही झाले आहे. तसेच, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने साचलेल्या पाण्यातून नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. अशातच राज्यात पुढील पाच दिवसात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Heavy rainfall alert to five district of Maharashtra)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे वातावरणातील बदलांचा आरोग्यावर, शेतीवर परिणाम होत आहे.

- Advertisement -

४७ टक्के अतिरिक्त पाऊस

राज्यात सरासरीच्या ४७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे. राज्यातील चारही हवामान विभागांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात पडला असून जुलैमधील पावसाने विदर्भामध्येही सरासरीहून अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे.

- Advertisement -

२८ जिल्ह्यांना पूराच्या पाण्याचा मोठा फटका

पूरस्थितीमुळे राज्यातील तब्बल २८ जिल्ह्यांना पूराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. पूराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या पूरस्थितीमुळे १०५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे सध्या वर्ध्यांत सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्यस्थिती एनडीआरएफचे जवान घटनास्थळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले आहेत.

या २८ जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशीम, यवतमाळ, धुळे, जालना, अकोला, बुलढाणा, भंडारा, नागपूर, नंदुरबार, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नांदेड, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सांगली, चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.


हेही वाचा – सर्वसामन्यांना मंत्रालयात पाण्याची बाटली नेण्यास बंदी; कारण वाचून व्हाल थक्क

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -