घरमहाराष्ट्रचिपळूणमध्ये पावसाची संततधार सुरूच,कोव्हिड सेंटर पाण्याने घेरले 21 रुग्णांचा जीव धोक्यात

चिपळूणमध्ये पावसाची संततधार सुरूच,कोव्हिड सेंटर पाण्याने घेरले 21 रुग्णांचा जीव धोक्यात

Subscribe

चिपळूनमध्ये सध्या जागोजागी पाणी साठले असून शहरात आत्तापर्यंत दोन जणांचा पावसाच्या पाण्यामुळे मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असून राज्यात अनेक ठिकाणी पूरपरीस्थिती निर्माण झाली आहे. पुढील पाच दिवस हवामान खात्याने मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तसेच चिपळूणमध्ये देखिल पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. अशातच आता मुसळधार पावसामुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कोव्हिड केंद्रातील 21 रुग्णांचा जीव देखील धोक्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर येथे कोरोनाचे 21 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला असून कोरोना रुग्णांचे प्राण संकटात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे कोव्हिड सेंटर बाहेर असलेली रुग्णवाहिका देखील वाहून गेली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे सेंटरच्या बाहेरील रस्ते ,संपुर्ण मार्ग पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले असून आतमध्ये प्रवेश करणे अशक्य झाले आहे. यामुळे कोरोना रुग्णांना अन्नपुरवठा करणे तसेच इतर मदत कार्य करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

चिपळूनमध्ये सध्या जागोजागी पाणी साठले असून शहरात आत्तापर्यंत दोन जणांचा पावसाच्या पाण्यामुळे मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापैकी एक महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसरी महिला वाहून गेली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चिपळून नगरपालिकेने पुराचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्यापुर्वी सज्ज केली होती. यामध्ये तीन बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड बोये आणि इतर सामग्रीचा आपत्कालीन यंत्रणेत समावेश होता. हे साहित्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आली होती अग्निशमन केंद्र पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणाही पुराच्या पाण्यात अडकली आहे. चिपळून मधील संपर्क यंत्रणा ठप्प झाल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आसल्याचे दिसतेय.


हे हि वाचा – मदत करा, आम्ही पुरात अडकलो आहोत, चिपळूणवासीयांचा टाहो!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -