कोकणात मुसळधार पाऊस; जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.

34 dead due to floods in andhra pradesh rains rainfall
Andhra Pradesh Rains: मुसळधार पावसाने आंध्र प्रदेशला झोडपले; आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागांच पावसाचे पाणी (Water Storage) साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. कोकणातही (Konkan) पावसाने जोर धरला आहे. कोकणात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. (heavy rainfall in kokan jagbudi river crossed warning level)

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, पावासाचा जोर असा कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, मंडणगड, खेड याभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच, राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला देखील पूर आलेला चित्र सध्या आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून पावसात जोर कायम राहिल्यास शेतीचा देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

लांजा तालुक्यातील विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंजणारी वरचा स्टॉप येथे मुंबई-गोवा महामार्गालगत ठेवण्यात आलेला मातीचा भराव पावसामुळे जवळच्या घर, दुकानात शिरून सामानाचे नुकसान झाले.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या कापसाळ सुर्वेवाडी येथील महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन तासांपासून चिपळूणमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. तसेच, आज पडलेल्या पावसामुळे पर्यायी मार्गावर दोन मोठ्या गाड्या फसल्याने हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस महत्वाचे: ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा इशारा