राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट जारी, तर पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने (heavy rainfall) राज्यभरात हजेरी लावली होती. जोरदार पावसामुळे राज्याच्या अनेक सखल भागांत पाणी साचले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच अल्प प्रमाणात तापमानातही वाढ झाली आहे.

Heavy rainfall
प्रातिनिधीक फोटो

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने (heavy rainfall) राज्यभरात हजेरी लावली होती. जोरदार पावसामुळे राज्याच्या अनेक सखल भागांत पाणी साचले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच अल्प प्रमाणात तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. परंतु, आता हवामान विभागाने (IMD) राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय पुण्यात मुसळधार पावसाचा इशाराही हवामन विभागाने वर्तवला आहे. (Heavy rainfall in Konkan today and Yellow and red alert Pune imd)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्टचा इशारा आहे. तसेच, गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, पुणे (Pune), सातारा (Satara), कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. गेल्या 24 तासात कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. फोंडा 186, माथेरान 116, दोंडामार्ग ९४, दाबोलीम 87, तर कर्जत 80 मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

याशिवाय, मध्य महाराष्ट्रात इगतपुरी 128, लोणावळा 116, महाबळेश्वर 107, आजरा 98, राधानगरी 85, गगनबावडा 66, शाहुवाडी 52, तर वेल्हेत 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील शिरगाव 168, कोयना 162, दावडी 138, अम्बोणे 112 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या द्रोणीय स्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पासाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.


हेही वाचा – “तुम्ही सहकार्य केल्यास चांगले निर्णय…”; संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी नरेंद्र मोदींचे खासदारांना आवाहन