घर महाराष्ट्र मुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरूच, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प,पूरस्थितीमुळे पुढील पाच दिवस...

मुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरूच, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प,पूरस्थितीमुळे पुढील पाच दिवस सावधानतेचा इशारा

Subscribe

पुढील पाच दिवस हवामान खात्याने मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात पावसाची दमदार बॅटिंंग सुरू असून राज्यात अनेक ठिकाणी पूरपरीस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक जिल्ह्यातील घरे पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील पाच दिवस हवामान खात्याने मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सातार,पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच मराठवाड्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे वाहतून विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना समोर येत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून 21 जुलै रात्री 10.30 वाजता इम्पॅक्ट वॉर्निंग देण्यात आली होती. यादरम्यान फ्लॅश फ्लडची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली होती. तसेच विविध भागात पावसामुळे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते.

बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली-

मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रा जवळील अनेक भाग पाण्याखाली गेला असून घरांमध्ये आणि इमातींमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच, उल्हास नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात देखील पाणी गेलं आहे. यामुळे हे केंद्र बंद करण्यात आलं आहे.

कोल्हापूरला महापूराचा धोका-
- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने कोल्हापूरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत. पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

कल्याणमधील एपीएमसी मार्केट आवारात पाणी-

गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणारी फळे,फुले ,अन्नधान्य,भाजीपाला याचे संपुर्ण नुकसान झाले असून. कल्याण खाडीच्या पाण्यामुळे मार्केट पाण्याखाली गेलं आहे.

मुंबई-गोवा महामार्ग बंद-
- Advertisement -

महामार्गावर पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले असून रत्नागिरी,चिपळूणच्या विशिष्ट पुलावर पाण्याने भरले आहे.यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.


हे हि वाचा – बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रेल्वे वाहतूक ठप्प

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -