महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून मुंबईसह (Mumbai) राज्याच्या अनेक भागांत पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. अशातच येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

monsoon weather update maharashtra rainfall deficiency in all four sub divisions

आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून मुंबईसह (Mumbai) राज्याच्या अनेक भागांत पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. अशातच येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, पुढचे दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (Heavy Rainfall In next 48 hours in maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) हवामान विभागाकडून (IMD) अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली असल्याने नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळे बळीराजा सुखावला आहे तर काही ठिकाणी दुबारपेरणीचे संकट आहे.

हेही वाचा – पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, पुढचे दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढच्या २४ तासांमध्ये कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात अहमदनगरमध्ये शिर्डी, नाशिक आणि सातार जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडूंब भरले असून शेतकऱ्यांच्या शेतामध्येही पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचीही दाणादाण उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – मुंबईत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; आरोग्य यंत्रणा सतर्क