घर देश-विदेश धो-धो पावसाचा पश्चिम रेल्वेवरील Express गाड्यांना फटका; प्रवाशांचे होतायेत हाल

धो-धो पावसाचा पश्चिम रेल्वेवरील Express गाड्यांना फटका; प्रवाशांचे होतायेत हाल

Subscribe

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रलहून दिल्ली, गुजरात, राजस्थानसाठी सुपरफास्ट गाड्या धावतात. या गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले जाते.

मुंबई : विश्रांतीनंतर पुन्हा सक्रीय झालेल्या पावसाने कहर करण्यास सुरूवात केली आहे. आज कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्याना फटका बसला असून, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.(Heavy rains hit express trains on Western Railway Plight of passengers)

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रलहून दिल्ली, गुजरात, राजस्थानसाठी सुपरफास्ट गाड्या धावतात. या गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले जाते. मात्र, पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुले या मार्गावरील एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशाना ताटकळत बसावे लागत आहे.

काही एक्स्प्रेस रद्द तर काहींचे बदलले मार्ग

- Advertisement -

कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. यामधे गोध्रा येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानक आणि रुळावर पाणीच पाणी साचले आहे. एवढेच नव्हे तर पाण्याची पातळी सतत वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.

या मार्गाने प्रवास करत असाल तर…

मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. इंदूर दोंड अवंतिका एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. राजधानीसह अवध पश्चिम सुवर्ण मंदिर जम्मू तावी एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी अडकून पडले होते. मुंबई आणि दिल्ली दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने राजधानीसह पॅसेंजर गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या तरुणाची आत्महत्या; जोपर्यंत पालकमंत्री येणार…

प्रवाशाना होतोय मनस्ताप

नियोजित मार्गांवरील रेल्वेगाड्या पश्चिम रेल्वेने भोपाळ-इटारसी-खंडवामार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. यामुळे गणेशोत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी क्रमांक 12953 मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन रविवारी सायंकाळी 5.10 वाजता सुटणार होती. पावसामुळे सात तास विलंबाने रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता रवाना करण्यात आली. गाडी क्रमांक 12961 मुंबई सेंट्रल – इंदूर-मुंबई सेंट्रल अवंतिका एक्स्प्रेस, इंदूर-दौंड- इंदूर एक्स्प्रेस, नागदा-रतलाम विशेष रतलाम – उज्जैन विशेष, दाहोद- रतलाम- दाहोद विशेष, रतलाम-नागदा विशेष या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 12939 पुणे-जयपूर जेसीओ ही गाडी 17 सप्टेंबर रोजी भेस्तान-जळगाव – भुसावळ – इटारसी – भोपाळ – संत हिरदरम नगर नगडा या मार्गावर वळवण्यात आली आहे.

हेही वाचा : तुम्ही इतर धर्मांवर बोलून दाखवा; सनातन धर्माच्या वादावर फडणवीसांचं आव्हान

या एक्स्प्रेस गाड्या झाल्या रद्द

वडोदरा-डहाणू रोड जेसीओ, डहाणू रोड- वडोदरा जेसीओ, वडोदरा सुरत जेसीओ, सुरत-वडोदरा जेसीओ, आनंद वडोदरा जेसीओ, मुंबई -अहमदाबाद जेसीओ, अहमदाबाद- मुंबई जेसीओ, मुंबई-गांधीनगर वंदे भारत जेसीओ, गांधीनगर-मुंबई वंदे भारत जेसीओ, मुंबई – अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस I जेसीओ, अहमदाबाद – मुंबई जेसीओ, दादर- पोरबंदर जेसीओ, बांद्रा टी-अमृतसर जेसीओ, मुंबई-अहमदाबाद जेसीओ, अहमदाबाद – मुंबई जेसीओ, मुंबई – अहमदाबाद जेसीओ, अहमदाबाद -मुंबई जेसीओ, अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस जेसीओ, मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस जेसीओ, बांद्रा टर्मिनस-श्री मारा वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेस जेसीओ, भरुच-सुरत जेसीओ, बिकानेर-बांद्रात जेसीओ या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -