घरमहाराष्ट्रपोलादपूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई; कायम उपाययोजनेची गरज

पोलादपूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई; कायम उपाययोजनेची गरज

Subscribe

पोलादपूर तालुक्यातील बहुतेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथेे पाणी साठवण्याची कोणतीच उपाययोजना नसते. पावसाचे पाणी तीव्र उतारामुळे वाहून जाते व समुद्राला जाऊन मिळते. याच कारणांमुळे येथील जनतेला मार्च, एप्रिल महिन्यातच प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिमग्याचा सण असल्याने पोलादपूर तालुक्यात चाकरमानी मोठ्या संख्येने आल्यामुळे पाणीसाठा लवकर संपला असून, त्यामुळे गावातील लोकांचे पाण्याविन्या हाल झाले आहेत. पिण्यासाठी व इतर कामासाठी पाणी नसल्याने लोक चिंतेत आहेत. काही ग्रामपंचायतींना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, त्याचा भुर्दंड छोट्या ग्रामपंचायतींना सहन करावा लागत आहे.

भविष्यात पोलादपूर तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पाणी नियोजनाची गरज आहे. नद्यांवर छोटे-छोटे बंधारे घालून पाणी आडविण्याची नितांत गरज आहे. पोलादपूर तालुक्यात फक्त रानबाजिरे येथे एमआयडीसीने बांधलेले धरण आहे. त्यामुळे पोलादपूर शहराला मोठा दिलासा मिळतो. पोलादपूर तालुक्यात पाणी सिंचनाची कोणतीच उपाययोजना केली नाही. तालुक्यात चार धरणे मंजूर असताना फक्त किनेश्वर व लोहारे खोंडा येथील धरणाचे काम सुरू होते. मात्र, नंतर तेही बंद करण्यात आले. कोतवाल व इतर धारणांचे तर कामच सुरूच केले नाही. देवळे व सवाद विभागातील धरणे शासकीय व जनतेच्या अनास्थेने रखडून पडली आहेत. कालांतराने जर निधी किंवा तांत्रिक अडचण सांगून हा प्रकल्प रद्द केला तर परस्थिती अवघड होईल. म्हणून भविष्यात पाणी नियोजन महत्त्वाचे आहे, नाहीतर पुढील काळ हा तालुक्यातील नागरिकांसाठी कठीण होणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -