घरताज्या घडामोडीइंदू मिल स्मारक; बाबासाहेबांचा पुतळा आता २५० ऐवजी ३५० फूटांचा होणार

इंदू मिल स्मारक; बाबासाहेबांचा पुतळा आता २५० ऐवजी ३५० फूटांचा होणार

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील इंदू मिल येथे होणारे राष्ट्रीय स्मारकाची उंची वाढविण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. याआधी फडणवीस सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची २५० फुटापर्यंत मर्यादित ठेवली होती. मात्र आज कॅबिनेट बैठकीत पुतळ्याच्या उंचीला परवानगी देण्यात आली आहे. २५० फुटांऐवजी पुतळ्याची उंची ३५० फूट आणि चबूतरा १०० फूट असा एकूण ४५० फुटांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. ४५० फूटांच्या उंचीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली आहे. राज्य सरकार आणि एमएमआरडीए मिळून या प्रकल्पाचे काम पुर्ण करणार आहे. तर स्मारकाला लागणाऱ्या सर्व परवानग्या आजच्या कॅबिनेट बैठकीत देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्तरावरचे भव्यदिव्य स्मारक असावे, असे खूप लोकांचे स्वप्न होते. त्याप्रमाणे अतिशय देखणे, दिमाखदार असे स्मारक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्मारकाचे काम शापुरजी पालनजी या ग्रुपला देण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान मोदींनी भूमीपूजन केले होते. मात्र २०२० मध्ये या कामाला गती मिळत आहे. तसेच २१ तारखेला शरद पवार देखील कामाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

जुनं सोडून द्या – अजित पवार

स्मारकाच्या कामाला उशीर का झाला? आजवर हे काम का होऊ शकले नाही? या प्रश्नांमध्ये आता मला पडायचे नाही. मागे जे झाले ते गंगेला मिळालं. मला मागचं काढण्यात रस नाही. राजकारण करण्याची ही वेळ नाही. निवडणूक आल्यानंतर जे काही बोलायचं ते बोलू, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -