Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र जळगाव: चोपडा तालुक्यातील सातपुडा डोंगरामध्ये प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळले, एकाचा मृत्यू, तर एकजण...

जळगाव: चोपडा तालुक्यातील सातपुडा डोंगरामध्ये प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळले, एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी

Related Story

- Advertisement -

जळगाव जिह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी आदिवासी परिसरात हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत उड्डाण प्रशिक्षकांचा मृत्यू झाला असून प्रशिक्षणार्थी महिला पायलट गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच या परिसरातील आदिवासी बांधवांनी धाव घेत हेलिकॉप्‍टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्‍यात दाखल केले. सध्या प्रशासनाचे सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले असून ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास करीत आहेत. दुपारी चारच्‍या सुमारास ही घटना घडली आहे.

चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात ही दुर्घटना घडली. हा संपूर्ण जंगल परिसर असल्यामुळे यंत्रणेलाही या भागात पोहचण्यासाठी अनेक अडचणी आल्या. घटनास्‍थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्‍याने प्रशासनाची देखील तात्‍काळ मदत मिळणे कठीण झाले होते. हे दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर NMIMS Academy of Aviation चे हे प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर असल्याची माहिती केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी दिली आहे. या घटनेनंतर चोपडा तहसिदार व नायब तहसिलदार तेथे पोहचले.

- Advertisement -

अंशिका गुर्जर असे जखमी महिला पायलटचे नाव

दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमधील जखमी महिलेचे आधारकार्ड येथील स्थानिक नागरिकांच्या हाती लागले आहे. त्यावर अंशिका गुर्जर असे नाव आहे. हे आधारकार्ड हेलिकॉप्टरमध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या महिला पायलटचे असल्याचे सांगितले जात

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे NMIMS चे होते

- Advertisement -

दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर NMIMS Academy of Aviation चे हे प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर होते. यात दोघांचा उड्डाण प्रशिक्षकांचा मृत्यू झाला तर महिला प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाली आहे. या घटनास्थळी तपासणी पथका तात्काळ दाखल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी दिली आहे.


 

- Advertisement -