Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Helium Day: विजयदुर्ग किल्ल्यावर आज साजरा होणार जागतिक हेलियम दिवस

Helium Day: विजयदुर्ग किल्ल्यावर आज साजरा होणार जागतिक हेलियम दिवस

Subscribe

विजयदुर्गच्या ज्या ठिकाणी हेलिमयचा शोध लावण्यात आला त्या ठिकाणी या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी हेलिमय दिन साजरा करणार आहेत. 'साहेबांचा कट्टा' या जागी विजयदुर्गचे नागरिक  हा हेलिमयम दिवस साजरा करणार आहेत.

हेलियमच्या शोधाच्या निमित्ताने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 18 ऑगस्ट रोजी जागतिक हेलियम दिन साजरा केला जातो. विजयदुर्गच्या ज्या ठिकाणी हेलिमयचा शोध लावण्यात आला त्या ठिकाणी या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी हेलिमय दिन साजरा करणार आहेत. ‘साहेबांचा कट्टा’ या जागी विजयदुर्गचे नागरिक  हा हेलिमयम दिवस साजरा करणार आहेत.(Helium Day World Helium Day will be celebrated today at Vijaydurg Fort)

ग्रीक देव हेलियस च्या नावावरून या वायूला हेलियम हे नाव देण्यात आलं. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरूनच हेलियम वायूचा शोध लावण्यात आला. विजयदुर्गवर ज्या ठिकाणाहून हेलिमयमचा शोध लागला त्या जागेला साहेबांचा कट्टा म्हटलं जातं. विजयदुर्ग किल्ल्यावर जोसेफ नॉर्मन लॉकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञाने 18 ऑगस्ट 1868 रोजी हेलिमय वायूचा शोध घेतला.

- Advertisement -

18 ऑगस्टला सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याची जवळून छाया टिपण्यासाठी विजयदुर्ग किल्ल्यावर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनचे सर नॉर्मल लॉकियर, फ्रान्सचे जेन्सन यांनी विजयदुर्गवरून दुर्बिण लावण्यासाठी विशिष्ट कोनामध्ये चौथरा बांधून घेतला. आता वेध होता, तो ग्रहणाचा. सूर्यग्रहणाचा वेध घेण्यासाठी दुर्बिणीवर स्पेक्ट्रॉमीटर बसवण्यात आला. त्यावेळी पिवळी रेषा म्हणजे हेलियम आहे, याचा शोध लागला.

हेलियम वायू कसा आहे? 

हेलियम हा असा एक घटक आहे, की जो प्रथम पृथ्वीवर न शोधता अवकाशात शोधला गेला. त्याचा अणूक्रमांक हा 2 आहे. हायड्रोजननंतर हा दुसरा हलका वायू आहे. याचा समावेश नोबल गॅस ग्रुपमध्ये होतो. हेलियम वायुचा उपयोग हा स्कुबा डायव्हिंगमध्येही करतात. खोल समुद्रात जाताना श्वसनासाठी ऑक्सिजनसह, नायट्रोजन आणि हेलिअम असलेले सिलेंडर वापरले जातात. नायट्रोजनच्या अपायाने ग्लानी येऊ नये म्हणून हेलिअमचा वापर होतो. ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हेलिअम असलेले हे सिलेंडर श्वसन- संस्थेच्या आजारावर वैद्यकीय क्षेत्रातही उपयोगी पडतात.

- Advertisement -

( हेही वाचा: उद्धव ठाकरे लागले लोकसभेच्या तयारीला; नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ मंत्र )

 

- Advertisment -