जितेंद्र नवलानींना देशाबाहेर जाण्यास मदत, संजय राऊतांचा गंभीर आरोप

ईडी अधिकाऱ्यांसाठी उद्योजक, व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवलानी हा परदेशात फरार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच नवलानी विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.

Sanjay Raut

ईडी अधिकाऱ्यांसाठी उद्योजक, व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवलानी हा परदेशात फरार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच नवलानी विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यानंतर नवलानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी “जितेंद्र नवलानी देश सोडून पळून गेलेत त्याचा अर्थ असा आहे की, कुणीतरी जे त्या संपुर्ण कटाचे सुत्रधार होते. त्यांनी जितेंद्र नवलानी यांना पळून जाण्यासाठी मदत केली आहे, ते पाहावे लागले”, असं म्हटलं.

“महाराष्ट्रात मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात आणि इतर 62 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही केंद्रिय तपास यंत्रणांचे अधिकारी आणि नवलानी मिळून खंडणीचे रॅकेट कशाप्रकारे चालवताहेत याच्याविषयी मी काही माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला जाग आली. मी स्वत: त्या संदर्भात प्रधानमंत्र्यांना त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. माझ्या माहितीप्रमाणे प्रधानमंत्र्यांनी सुद्धा हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवलं. त्यानंतर मुंबईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राथमिक तपास पुर्ण केला. त्यांच्याही हाती काही पुरावे लागले आणि त्या तपासानंतरच त्यांनी जितेंद्र नवलानी व इतर 62 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. माझ्याकडे ही सुद्धा माहिती होती की, त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पण आता जर ही माहिती समोर असेल, की जितेंद्र नवलानी देश सोडून पळून गेलेत त्याचा अर्थ असा आहे की, कुणीतरी जे त्या संपुर्ण कटाचे सुत्रधार होते. त्यांनी जितेंद्र नवलानी यांना पळून जाण्यासाठी मदत केली आहे, ते पाहावे लागले.”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

कडवट आणि झुंजार शिवसैनिकाचे निधन : राऊत

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. यांच्या निधनानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजली वाहिली असून, कडवट आणि झुंजार शिवसैनिक लटके यांचे काल दुबईत निधन झालं असं म्हटलं.

“अनेक वर्ष रमेश लटके हे शिवसेनेचे शाखाप्रमुख पदापासून नगरसेवर, आमदार अशा विविध पदांवर त्यांनी अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केलं. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये रमेश लटके आघाडीवर असायचे. काल संध्याकाळी त्यांचं आणि आमचं बोलणं झालं. त्यावेळी त्यांची तब्येत व्यवस्थित होती. मात्र रात्री 12 वाजता समजलं त्यांचं निधन झालं. रमेश कुटुंबासहित दुबईत असल्याने त्यांचे पार्थिव गुरूवारी किंवा शुक्रवारी मुंबईत आणण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कार होतील.”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

महाराष्ट्र सुरक्षित आहे, इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही : राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काल जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सांगितलं. तसेच राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे नांदगावकरांनी सांगितले. यावरही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्र सुरक्षित आहे, इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, शिवसेना भवनात असे धमकीचे पत्र रोज येतात”, असे त्यांनी म्हटलं.


हेही वाचा – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन