घरताज्या घडामोडीDSK fraud Case : हेमंती कुलकर्णी यांना कोर्टाकडून जामीन मंजूर

DSK fraud Case : हेमंती कुलकर्णी यांना कोर्टाकडून जामीन मंजूर

Subscribe

दीपक कुलकर्णी यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी आणि कुटूंबीय यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्यात त्यांच्या पत्नीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणात दीपक कुलकर्णी यांना जामीन देण्यासाठी मात्र हायकोर्टाने नकार दिला आहे. हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाल्याने लवकरच त्यांची कोर्टातून सुटका होईल. फसवणुकीच्या आरोपाखाली २०१८ पासून तुरूगांत असलेल्या कुलकर्णी दाम्पत्याच्या प्रकरणात शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. पण या प्रकरणातील निकाल मात्र हायकोर्टाने राखून ठेवला होता. हेमंती यांना आता जामीन मिळाला आहे खरा, पण त्याचवेळी दीपक कुलकर्णी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला आहे. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयात डी एस के अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. याआधीच काही कुलकर्णी कुटूंबीयांपैकी काही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मोठ्या प्रमाणात ठेवीदारांना फसवल्याप्रकरणी २०१७ मध्ये कुलकर्णी कुटूंबाविरोधात एफआयआर दाखल झाली होती. त्यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. जवळपास ३३ हजार ठेवीदारांनी या प्रकरणात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणात कारवाई करत १७ फेब्रुवारी २०१८ पासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणात दीपक कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांनाही न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. पण त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज न्यायालयाने जूनमध्ये झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने फेटाळला होता. फसवणुकीच्या प्रकरणात दीपक कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद, पुतणी, जावई यांनाही अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

मनी लॉड्रिंगमुळेच अंमलबजावणी संचलनालयानेही न्यायालयाची परवानगी मिळवत कुलकर्णींची चौकशी केली होती. पुण्यात अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचेही या तपासात आढळले होते. तसेच परदेशातही त्यांच्या मालमत्ता असल्याचे आढळले होते. साधारणपणे पुण्यातील जागांची किंमत ही तीनशे कोटींपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नेमका काय आहे घोटाळा ?

डीएसके यांनी आपल्या कंपन्यांद्वारे मुदतीच्या ठेवीच्या योजना सुरू केल्या. या योजनांना गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद देत १ हजारांहून अधिक रूपयांची गुंतवणुक केली होती. पण अनेक गुंतवणुकदारांची या प्रकरणात फसवणूक जाली. अनेकांना घरांचा ताबाही मिळाला नाही. त्यामुळेच अनेकांचे पैसे या प्रकरणात अडकून पडले आहेत. या घोटाळ्यात बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीही डीएसके यांना मदत केल्याचे उघड झाले आहे. आपल्या नातेवाईकांच्या नावे कंपन्या उघडून डीएसके असोसिएट्स या मुख्य कंपनीला दामदुप्पट दराने विकण्याचा प्रकार या संपुर्ण घोटाळ्यात समोर आला. डीएसकेंना कर्ज देताना बॅंकेच्या अधिकाऱ्यांची साथ होती. तसेच डीएसकेंना विविध बॅंकांनी कर्ज दिली होती. ही कर्जाची रक्कम तीन हजार कोटींहून अधिक आहे.

- Advertisement -

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -