घरताज्या घडामोडीअडसूळांना न्यायालयाचा दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब

अडसूळांना न्यायालयाचा दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब

Subscribe

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. यापूर्वी हायकोर्टाने अडसूळ यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. तर आता त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २५ जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. अडसूळ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून कारवाई सुरु आहे. ईडीने अडसूळ यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती. त्यावेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अडसूळांनी न्यायालयात धाव घेतली होती.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सिटी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने समन्स पाठवले आहे. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणी अडसूळांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला आहे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. यामुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिटी सहकारी बँकेमध्ये ९०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार अडसूळ यांच्याविरोधात करण्यात आली आहे. यावर ईडी चौकशी करत आहे.

- Advertisement -

अडसूळांच्या घरी ईडीचे पथक

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये ईडीचे पथक दाखल झाले होते. चौकशी सुरु असताना अडसूळ यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर एकीकडे अडसूळ यांनी कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मुंबई सत्र न्यायालयाचे सुरुवातीला अडसूळ यांचा अर्ज फेटाळला होता. यानंतर पुन्हा अर्ज करण्यात आला होता.

सिटी सहकारी बँक प्रकरण काय आहे?

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्री खुर्चीवर नसतानाही राज्य चांगले पद्धतीने चाललंय याचं श्रेय…, रावसाहेब दानवेंची ठाकरे सरकारवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -