Homeताज्या घडामोडीBadlapur : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, मृत्यूला पोलीस जबाबदार; न्यायालयाचा निर्णय

Badlapur : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, मृत्यूला पोलीस जबाबदार; न्यायालयाचा निर्णय

Subscribe

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. मात्र, आता न्यायालयाने अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटबाबत पोलिसांनी केलेल्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. (High Court Clamis that Akshay Shinde was killed in an encounter from Badlapur Police in self defense is doubtful )

बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या चौकशीच्या अहवालात स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद असल्याचे लिहिण्यात आले आहे.

पोलिसांचा दावा काय होता?

बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. अक्षय शिंदेवरील चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत असं फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटलं आहे. पाच पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटते एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय मारला गेला असा पोलिसांचा दावा होता. मात्र, हाच दावा संशयास्पद असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालात म्हटले आहे.


हेही वाचा – Hotel Trident : धक्कादायक! ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह