घरमहाराष्ट्रमंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा; तूर्त अटक न करण्याचे ईडीला निर्देश

मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा; तूर्त अटक न करण्याचे ईडीला निर्देश

Subscribe

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मंदाकिनी खडसे यांना तूर्त अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. भोसरी जमीन घोटाळ्यातील खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्यानं मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाकडून मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने ईडीला तूर्त अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत तपासयंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने खडसे यांना दिले आहेत. या काळात दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावणं मंदाकिनी खडसेंना अनिवार्य असणार आहे. दरम्यानच्या काळात अटक झाल्यास १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मंदाकिनी खडसेंची सुटका करण्याचे निर्देश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

एकनाथ खडसेंवरील सुनावणी २१ ऑक्टोबरला

एकनाथ खडसे यांच्यावर देखील भोसरी भूखंड प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मात्र, खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांच्यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावं लागणार असल्याचं सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यावर खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे असून या प्रकरणात पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -