घरठाणेकल्याणमधील हिंदुहृदसम्राट शरीर सौष्ठव स्पर्धेला हायकोर्टाची परवानगी

कल्याणमधील हिंदुहृदसम्राट शरीर सौष्ठव स्पर्धेला हायकोर्टाची परवानगी

Subscribe

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी साजरा होत असणाऱ्या वाढदिवसानिमित्त हिंदुहृदसम्राट श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या मैदानात आयोजित केले होते. याबाबत ठाकरे यांच्या गटांचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुखांना परवानगीचे पत्रही पालिकेने दिले. नंतर आचारसंहितेचे कारण देऊन ते नाकारण्यात आले होते. मात्र हायकोर्टाने याबाबत परवानगीचे आदेश दिल्याने पालिकेने नाकारलेल्या मैदानात शरीर सौष्ठव स्पर्धेचा मार्ग सुकर झाला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख असलेले विजय उर्फ बंड्या साळवी यांनी हिंदुहृदसम्राट श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त पालिकेच्या जयंत देवळेकर मैदानात आयोजिले होते. याबाबत साळवी यांनी रीतसर परवानगी पालिका प्रशासनाकडे मागत ती परवानगी देखील देण्यात आली होती. यानंतर पालिकेचे मैदानावर आकारण्यात आलेले भाडे देखील भरत तशी देयकाची पावती देखील पालिकेकडून देण्यात आली होती.

- Advertisement -

या स्पर्धेसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना मालमत्ता विभागाकडून शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आदर्श आचारसंहिता असल्याचे साळवी यांना पत्र देऊन परवानगी रद्द केले असल्याचे सांगितले. याबाबत साळवी यांनी मुंबई हायकोर्टात या निर्णयाविरुद्ध महानगरपालिकेच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून याचिका दाखल केली होती. यावेळी हायकोर्टाने आज आपला निर्णय घेत शरीर सौष्ठव स्पर्धेला परवानगी दिल्याचे आदेश जारी केले.


हेही वाचा : त्यांना कामातून उत्तर देऊ; दावोस गुंतवणुकीच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -