नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा कायम

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे अटकेची त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाने त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

high court postponed nitesh rane pre-arrest bail application hearing

आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु राणेंना अटकेपासून संरक्षण कायम ठेवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणेंचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्ला झाल्यापासून नितेश राणे गायब आहेत. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी हायकोर्टात सत्र न्यायलयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवडणूक होती. तर आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार होती. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस होता. जिल्हा बँकेवर अध्यक्षपद मनीष दळवी झाले असून भाजपचे वर्चस्व आले आहे. परंतु नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. सोमवार, १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे सोमवारी या प्रकरणावरी सुनावणी होणार असून याच दिवशी निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे अटकेची त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाने त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यालयाकडून अटकेपासून संरक्षणाचा दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सिंधुदुर्गातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संतोष परब जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे षडयंत्र असल्याचे पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले आहे. तसेच आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर नितेश राणे गायब झाले आहेत. त्यांच्या वकिलांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. यानंतर वकील संग्राम देसाई यांनी हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.


हेही वाचा : आशिष शेलार आणि महापौरांनी सामंजस्याने घेत वाद मिटवावा, हायकोर्टाचा सल्ला