घरमहाराष्ट्रट्विटरवर उत्तर देऊ शकता मग कोर्टातही उत्तर द्या ! नवाब मलिक यांना...

ट्विटरवर उत्तर देऊ शकता मग कोर्टातही उत्तर द्या ! नवाब मलिक यांना हायकोर्टाने फटकारले

Subscribe

नवाब मलिक तुम्ही उद्यापर्यंत तुमचे उत्तर दाखल करा. तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर तुम्ही इथेही (कोर्टात) उत्तर देऊ शकता, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना फटकारले.

नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्या. माधव जामदार यांनी मलिक यांना दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे वकील अर्शद शेख यांनी कोर्टाला सांगितले की, नवाब मलिक यांच्याकडून दररोज काही खोटे आणि बदनामीकारक विधाने केली जात आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबद्दल आणखी बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. सोमवारी सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीबद्दल एक ट्विट पोस्ट केले आहे. तसेच किमान या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत कोर्टाने एकतर मलिक यांना ज्ञानदेव वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल विधाने करण्यापासून रोखावे, अशी मागणी अर्शद शेख यांनी केली.

नवाब मलिक यांचे वकील अतुल दामले यांनी दाव्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागताना कोर्टाने सांगितले की, ज्ञानदेव वानखेडे आपल्या सज्ञान मुलांच्यावतीने बोलू शकत नाही आणि इतर व्यक्तींनी सोशल मीडियावर काय टिप्पणी केली आहे, याचा दोष मलिकांना देता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -