घरमहाराष्ट्रदोन पद्धतींनी होणार विद्यार्थ्यांची परीक्षा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत...

दोन पद्धतींनी होणार विद्यार्थ्यांची परीक्षा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोठी माहिती

Subscribe

इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात होणार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पुन्हा एकदा कोरोना आपले रौद्ररुप दाखवतो की काय अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. तर मागील १० महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता कुठे सुरु करण्यात आल्या होत्या परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्याची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनकडे होत आहे. यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा कशा होणार, ऑफलाईन होणार की ऑफलाईन होणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. तसेच आता अंतिम परीक्षांची वेळ आल्या असल्यामुळे शिक्षण विभागालाही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा पद्धतीनं होणार यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे की, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा या दोन प्रकारात घेणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणर आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यायची की ऑफलाईन पद्धतीने द्यायची हा पर्याय ऐच्छिक असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. या परीक्षांच्या पद्धतीसंदर्भात विद्यापीठाने निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यापीठाकडून हे पर्याय उपलब्ध कले आहेत. ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

- Advertisement -

तसेच राज्यातील इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील परीक्षांबाबत संभ्रम दूर झाला आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नेमणुक

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -