घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राने कोरोना लसीकरणात केला राष्ट्रीय विक्रम

महाराष्ट्राने कोरोना लसीकरणात केला राष्ट्रीय विक्रम

Subscribe

राज्यात तब्बल ४ कोटी ६२ लाख लसीकरण करत महाराष्ट्र राज्याने केला राष्ट्रीय विक्रम.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून यामध्ये ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांच्या व्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जात होते. त्यानंतर आता व्याधी नसलेल्या ४५ वर्षांच्या व्यक्तींना देखील लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात सर्वात अधिक लसीकरण केले जात असून महाराष्ट्र राज्याने कोरोना लसीकरणात राष्ट्रीय विक्रम केला आहे. महत्तावाची बाब म्हणजे ३ एप्रिल रोजी राज्यात तब्बल ४ कोटी ६२ लाख लसीकरण करत महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय विक्रम केला आहे, याबाबतची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे शनिवारी महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला ६ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. ३ एप्रिल रोजी राज्यभर ४ हजार १०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. दरम्यान, पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७६ हजार ५९४ जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (४६ हजार ९३७), नागपूर (४१ हजार ५५६), ठाणे (३३ हजार ४९०) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.


हेही वाचा – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -