घरCORONA UPDATECorona Live Update: संशयित आरोपीला कोरोना; ५ पोलीस क्वॉरंटाइन, पोलीस दलात खळबळ

Corona Live Update: संशयित आरोपीला कोरोना; ५ पोलीस क्वॉरंटाइन, पोलीस दलात खळबळ

Subscribe

संशयित आरोपीला कोरोना; ५ पोलीस क्वॉरंटाइन

एक चिंता वाढवणारी घटना पिंपरीमध्ये घडली आहे. एका संशयित आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. तसेच आधीच पोलीस आयुक्तालयातील सात जण हे करोनाबाधित आढळलेले आहेत. यापैकी, एका अधिकाऱ्याला घरी सोडण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

‘BSF’च्या २१ जवानांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, सीमेवर लढणारे जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, आता हे जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (BSF)चे आणखी २१ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सच्यावतीने देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -


राज्यात २६०८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६० जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. लॉकडाऊन उठवण्यासाठी आता फक्त ७ दिवसच शिल्लक राहिले असताना रुग्णसंख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांत राज्यात २६०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार १९०वर गेली आहे. त्यासोबतच ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत १५७७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ४०४ झाली आहे. त्यामुळे ३१ तारखेनंतर राज्यातल्या काही भागांमध्ये लॉकडाऊ उठण्याविषयी संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. (सविस्तर वाचा)


विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंग नियमात बदल

भारतीय रेल्वेसेवा सुरळीत सुरु करण्यासाठी १२ मे पासून ३० विशेष रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात देशातील १५ वातानुकूलित रेल्वेच्या ३० फेऱ्या सुरु केल्या आहे. मात्र, आता या विशेष रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगच्या नियम आणि अटींमध्ये भारतीय रेल्वेकडून सुधारणा केली आहे. त्यानुसार आता प्रवाशांना या गाड्यांचे आगाऊ आरक्षण कालावधी ७ दिवसांवरून वाढवून आता ३० दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (सविस्तर वाचा)


पोलीस मदतीसाठी दिलेल्या मंत्रालय कर्मचाऱ्यांची कोंडी

मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सेवा वर्ग केलेले मंत्रालयातील चौदाशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी सध्या विचित्र कोंडीत सापडले आहेत. कोरोनामुळे सहकुटुंब गावी गेलेल्या या कर्मचाऱ्यांपुढे आता मुंबईला येण्यापासून ते मुंबईत आल्यानंतर सुरक्षितपणे राहण्या-खाण्यापर्यंतचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. मुंबई आणि मुंबईचा परिसर रेड झोन आहे. अशातच  कोरोनाच्या भीतीने अनेक सोसायटीत बाहेरून आलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे नोकरीच्या भीतीपोटी मुंबईत यायचे म्हटले तरी व्यवस्था कशी आणि कुठे होणार या विवंचनेने त्यांना ग्रासले आहे. (सविस्तर वाचा)


वसईहून गोरखपूरसाठी सुटलेली श्रमिक ट्रेन चक्क ओडिसात पोहोचली!

सतत सुरू असलेल्या भारतीय रेल्वेचा गोंधळ काही थांबेनासा झालेला आहे. गोरखपूरकरता सुटलेली एक श्रमिक ट्रेन शुक्रवारी संध्याकाळी गोरखपूरला न पोहोचता चक्क शनिवारी सकाळी ओडिशाच्या रुरकेला स्थानकात पोहोचल्याने श्रमिक प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. यावरून आता रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. मात्र या घटनेवर पश्चिम रेल्वेकडून खुलासा करण्यात आलेला आहे. ज्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या मार्गात बदल केला असल्याचं स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाने दिलं आहे. (सविस्तर वाचा)


२५ मे पासून वातावरणात बदल

मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या आहे, परंतु देशातील लोकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये जोरदार उष्णता जाणवत आहे. शुक्रवारी दिल्लीत कमाल तापमान ४३.८ अंश सेल्सिअस होते, जे या वर्षातील सर्वाधिक आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, दिल्ली व त्याच्या आसपासच्या भागात उष्णतेची लाट कायम राहील. २५ मे नंतर हवामान बदलू शकेल आणि मान्सूनपूर्व हालचालीत तापमान कमी होऊ शकेल. त्याचबरोबर आयएमडीने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील काही दिवस अलर्ट जारी केला आहे. (सविस्तर वाचा)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कोरोना योद्ध्यांसाठी खुलं पत्र!

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाच्या लढ्यात अनेक योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता लढा देत आहेत. याच महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून, प्रत्येक कोविड योध्याला उद्देशून त्यांनी एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे. (सविस्तर वाचा)


भिवंडीतून नववी विशेष श्रमिक ट्रेन मधुबनी बिहार साठी रवाना

लॉकडाऊनमुुळे भिवंडीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी बिहार मधुबनीसाठी नववी विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली. या ट्रेन मधून १ हजार ६५० प्रवासी बिहार मधुबनी साठी रवाना झाले. यापूर्वी देखील अशाच प्रकारे बिहार मधूबनीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. तर त्याआधी गोरखपूर, जयपुर आणि पटनासाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह मनपा आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत यावेळी कामगारांना निरोप दिला आहे.

मजुरांना निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानी दिली आहे. (सविस्तर वाचा)


‘राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस त्यांना मी व्यक्तिश: भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती. यापलिकडे काही नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी प्रेम आणि आदर आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध जसे पिता-पुत्राचे असावेत तसेच आहेत. दऱ्या वगैरे आमच्यात पडत नाही. राज्यपाल प्रियच असतात ते या राज्याचे पालक आहेत. घटनात्मक प्रमुख आहेत. विरोधक सतत इथे येतात त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचे दालन किंवा बंगला राजभवन परिसरात असावे, असे अनेकांनी सांगितले याचा अर्थ ती राजभवनावर टीका होत नाही’. (सविस्तर वाचा)


रेल्वे मंत्रालयाची आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे.


बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आलेले खासदार संजय राऊत देखील या बैठकीला उपस्थित आहेत. 


गोवा कोरोनामुक्त झाला असून भारतीय पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे वक्तव्य गोव्याच्या राज्यपालांनी केले आहे.


दिल्ली इंटरनॅशनल एयरपोर्ट ३ वरुन सर्व विमाने उड्डाण होणार आहेत.


लॉकडाऊनमध्ये राज्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. टिक टॉकसारखे व्हिडिओ बलात्कार, अॅसिड अटॅक सारख्या कृत्यांना प्रवृत्त करत आहेत. अशा घटनांवर सायबर क्राइम ब्रांच लक्ष ठेवून आहे. तसेच सोशल मीडियावर अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही देशमुख म्हणाले.


देशामध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ६५४ नव्या कोरोना केसेसची भर पडली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. तर १३७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख २५ हजार १०१ इतकी झाली आहे. त्यातील ६९ हजार ५९७ हे अॅक्टिव्ह केसेस असून मृतांची संख्या ३ हजार ७२० इतकी झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


साताऱ्यात काल रात्री ४० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा २४१ वर पोहोचला आहे.


राज्यात शुक्रवारी २ हजार ९४० नवे रुग्ण सापडले असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. तर ६३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १५१७ झाली आहे. राज्यात सातत्याने दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत असताना शुक्रवारी तब्बल २९४० रुग्ण सापडल्याने सरकारच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्याचप्रमाणे राज्यात ६३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद ३, सातार्‍यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. (सविस्तर वाचा)


राज्याप्रमाणेच मुंबईत देखील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल १ हजार ७५१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ हजारांच्याही वर जात २७ हजार ६८ इतका झाला आहे. मुंबईत काल एकूण २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ९०९ झाला आहे. मुंबईत काल दिवसभरात ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ७ हजार ०८० इतका झाला आहे. (सविस्तर वाचा)


जगभरात आतापर्यंत कोरोनाचे ५३ लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील २४ तासात जगातील २१३ देशांमध्ये १ लाख ०७ हजार ७०६ नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळे ५ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण ५३ लाख ०३ हजार ७१५ लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या ३ लाख ३९ हजार ४१८ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात २१ लाख ५६ हजार २८८ रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -