नाशिक शहरातील महाराष्ट्र बंदची क्षणचित्रे

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यात आज महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी शालिमार परिसरात मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी आवाहन फेरी काढत व्यापार्‍यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापार्‍यांनी शालिमार परिसरात दुकाने बंद ठेवली.

मुंबई, गुजरातसह राज्याच्या विविध भागात भाजीपाल्याचा पुरवठा करणार्‍या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीट बंद पाळण्यात आला. शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्याने दिवसभरात 15 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.