घरक्राइमउच्चशिक्षित भामट्याचा प्रताप, बी.ए., बी.कॉम.सह ITIच्या पदव्यांची विक्री

उच्चशिक्षित भामट्याचा प्रताप, बी.ए., बी.कॉम.सह ITIच्या पदव्यांची विक्री

Subscribe

गेल्या काही वर्षात राज्यात अनेक बोगस पदव्या विकण्याचे काम सर्रासपणे सुरू असल्याची माहिती समोर आली होती. पण अशी अवैध काम करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आलेला आहे. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून या प्रकरणी एका उच्चशिक्षित भामट्याला अटक केली आहे.

गेल्या काही वर्षात राज्यात अनेक बोगस पदव्या विकण्याचे काम सर्रासपणे सुरू असल्याची माहिती समोर आली होती. पण अशी अवैध काम करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आलेला आहे. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून या प्रकरणी एका उच्चशिक्षित भामट्याला अटक केली आहे. इम्रान सय्यद इब्राहिम (वय वर्ष 38) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. इम्रान हा गेल्या 4 वर्षांपासून दहावी, बारावी, बीए, बी.कॉम. पदव्यांसह आयटीआयची बोगस प्रमाणपत्रे विकत होता. (Highly Educated Man Sells 50-60k Fake ITI Degrees Including BA, B.Com) ‘अल हिंद’ नामक बनावट विद्यापीठ स्थापन करून त्या नावे त्याच्याकडून बोगस पदव्या विक्रीचे काम करण्यात येत होते, अशी माहिती समोर आली आबे. तर त्याच्याकडून या पदव्यांची 50 ते 60 हजार रुपयांना विक्री करण्यात येत होती, असे देखील सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – शिकाऊ उमेदवारांना ‘MAPS’अंतर्गत ५ हजार रुपये भत्ता; एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान याने 2017 मध्ये ‘अल हिंद’ नामक बनावट विद्यापीठाची वेबसाईट तयार केली. त्यानंतर त्याने याच्या माध्यमातून आयटीआयची बनावट प्रमाणपत्रे विकण्यास सुरूवात देण्यास सुरुवात केली. याच्याच माध्यमातून त्याने विविध पदव्यांचे प्रमाणपत्र देण्यास देखील सुरूवात केली. धक्कादायक बाब म्हणजे याच माध्यमातून पैसे गोळा करून तो छत्रपती संभाजीनगरमध्ये जमीन खरेदी करणार होता. तर या जमिनीवर तो विद्यापीठाची स्थापना करणार होता, अशी माहिती समोर आली आहे.

इम्रानने या कामासाठी काही एजंटची देखील नेमणूक केली होती. त्यांच्या माध्यमातून तो बनावट प्रमाणपत्रे तयार करून त्यांचे विविध ठिकाणी वाटप करत होता. दरम्यान आता पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तर ही प्रमाणपत्रे कोणाकोणाला वाटप करण्यात आली, याचा सुद्धा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तर पोलिसांनी आरोपी इम्रान याच्याकडून 35 बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहे. तर हे एक मोठे रॅकेट असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी इम्रानच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

आरोपी इम्रान हा स्वतः उच्चशिक्षित आहे. त्याने हैद्राबाद येथील एका विद्यापीठातून एमबीए-आयटीची पदवी घेतली आहे. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत छत्रपती संभाजीनगर येथे राहण्यास आला. दरम्यान 2019 मध्ये महाराष्ट्रात राज्य सरकारने महाराष्टॅ स्टेट ओपन बोर्ड स्कूलची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाने राज्यात शैक्षणिक जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली. हे धोरण अंमलात आल्यानंतर आरोपी इम्रान याने याचा गैरफायदा घेत बनावट वेबसाईट बनवून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यास सुरूवात केली, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -