नवी दिल्ली : गेल्या काही वर्षापासून हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे की नाही? यावरून वाद सुरू आहे. हा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन याने एका कार्यक्रमात ‘हिंदी ही देशाची राष्ट्रीय भाषा नाही’ असे विधान केले आहे. 10 जानेवारी रोजी आपण विश्व हिंदी दिवस म्हणून देशभर साजरा करतो. याच दिवशी अश्विनेन वक्तव्य केल्यामुळे चर्चा रंगली आहे. अशातच भाजपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी अश्विनच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. (Hindi is not the national language K Annamalai supports R Ashwin statement)
चेन्नईममध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना अश्विन विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले की, कोणाला हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यात रस आहे का? यावेळी कोणीही हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यास स्वारस्य दाखवले नाही. यानंतर अश्विन म्हणाला की, “मला यासाठी असे विचारावेसे वाटले. कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर ती अधिकृत (फक्त कामाची) भाषा आहे.” त्याच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना के. अन्नामलाई यांनी आर अश्विनचे वक्तव्य बरोबर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही आणि हे वक्तव्य फक्त माझा मित्र अश्विन याचे नाहीय. कारण हिंदी ही एक संपर्क भाषा होती, ती संवादाची भाषा आहे.
#Watch | தமிழுக்கு அதிர்ந்த அரங்கம்.. இந்திக்கு SILENT.. “இந்தி தேசிய மொழி இல்ல”.. பதிவு செய்த அஸ்வின்!
சென்னையில் உள்ள தனியார் பொறியியல் கல்லூரியில் நடைபெற்ற பட்டமளிப்பு விழாவில் மாஸ் காட்டிய கிரிக்கெட் வீரர் அஸ்வின்#SunNews | #Chennai | #Ashwin | @ashwinravi99 pic.twitter.com/TeWPzWAExQ
— Sun News (@sunnewstamil) January 9, 2025
युझरकडून संताप व्यक्त
दरम्यान, अश्विनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका युझरने तर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “दक्षिण भारतीय, खासकरून तमिळ भाषिक लोकांनो, तुम्ही क्रिकेट खेळू नका, कारण त्यात बहुसंख्य खेळाडू हे हिंदी भाषिक आहेत. तसेच, जे संघांचे मालक हिंदी भाषेत संवाद साधण्याचा पर्याय पसंत करतात, त्यांच्यासाठी कृपया आयपीएल खेळणे थांबवावे. याशिवाय टेक कंपन्यांच्या सीईओ पदांचा आनंद घ्यावा आणि फक्त तुमच्या मालकीच्या खेळाडूंनाच कामावर ठेवावे”, असा सल्ला दिला आहे.