घरमहाराष्ट्रपुणेभाजपला टक्कर देण्यासाठी हिंदू महासंघाचा 'हा' उमेदवार मैदानात!

भाजपला टक्कर देण्यासाठी हिंदू महासंघाचा ‘हा’ उमेदवार मैदानात!

Subscribe

भाजपमधील हे नाराजी नाट्य सुरू असतानाच एका हिंदुत्ववादी नेत्यानेही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. ­­­­याच विधानसभा मतदारसंघात भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी हिंदू महासंघाने आपला उमेदवार पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.

पुण्यातील कसबा मतदारसंघातून भाजपकडून टिळकांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण समाज दुखावला गेलाय. अशात आता कसबा पोटनिवडणुकीच्या मैदानात हिंदु महासंघानं उडी घेतलीय. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे दवे यांनी सांगितले आहे. खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासोबतच पुणेश्वराला मुक्त करणे तसेच स्वच्छ, सुंदर कसबा हे आपले ध्येय असल्याचे दवे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

भाजपने कसबा पोटनिवडणुकीतून टिळक घराण्याला डावललं आहे. त्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रासने हे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र, टिळक कुटुंबाला तिकीट ने दिल्यामुळे मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधील हे नाराजी नाट्य सुरू असतानाच एका हिंदुत्ववादी नेत्यानेही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -