घरताज्या घडामोडीहिंगणघाट प्रकरण : आरोपी विकी नगराळे याचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट प्रकरण : आरोपी विकी नगराळे याचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जळीतकांडातील आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जळीतकांडातील आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपींने तुरुंगात पांघरण्याकरता देण्यात आलेल्या ब्लँकेटच्या चिंधीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, याबाबत तरुंग प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी हा आरोप फेटळाला असल्याचे देखील समोर आले आहे. ‘अशाप्रकारचे कोणतेही कृत्य केले नसल्याचे’, तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.

मला गोळी झाडून मारा

“माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय, असे म्हणत मला गोळी झाडून मारा”, अशी मागणी देखील यापूर्वी आरोपीनी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला पीडितेच्या मृत्यूची माहिती नव्हती. पीडितेच्या मृत्यूच्या दुसऱ्या  दिवशी (११ जानेवारी) त्याला याबद्दल माहिती मिळाली. यानंतर तो काही काळ नि:शब्द होऊन कारागृहात उभा राहिला आणि नंतर बॅरेकमध्ये आपल्या पलंगावर बसला. मात्र, काही वेळेनंतर त्याच्या चेहऱ्यावर घटनेबाबत कोणतेही दुःख दिसले नाही. मात्र, नियमित झडती दरम्यान आरोपीने माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय, असं म्हणत मला गोळी झाडून मारा, अशी मागणी केली होती.

- Advertisement -

काय आहे हिंगणघाट प्रकरण

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे यांने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -