घरमहाराष्ट्रहिंगणघाट प्रकरण: साक्ष नोंदवताना आईला अश्रू अनावर

हिंगणघाट प्रकरण: साक्ष नोंदवताना आईला अश्रू अनावर

Subscribe

पिडितेच्या आई-वडिलांची माफी मागून उलटतपासणीस सुरुवात

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटमधील प्राध्यापिकेच्या जळीतकांडामुळे संपूर्ण राज्याने हळहळ व्यक्त केली होती. या जळीतकांड प्रकरणाने अवघे राज्य हदरवून सोडले होते. प्राध्यापिकेच्या जळीतकांड प्रकरणाबाबत आई आणि वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्ष देताना पडित प्राध्यापिकेच्या आईला अश्रू अनावर झाले. पिडेतेच्या आईला अस्वस्थ वाटल्यामुळे न्यायालयाचे कामकाजही १० ते १५ मिनिटे तहकूब करण्यात आले असल्यचे वकिलांनी सांगितले. आईसह पिडितेच्या वडिलांचीही यावेळी उलट तपासणी करण्यात आली. पिडितेच्या आई-वडिलांना उलट प्रश्न विचारताना त्रास झाला. त्यामुळे पिडितेचे आई-वडिल कोर्टात आल्यानंतर त्यांची माफी मागितली. त्यांनी माफ केल्यावर त्यांना उलट प्रश्न विचारले असल्याचे आरोपीचे वकिल ॲड. भूपेंद्र सोनू यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण

वर्ध्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिका कॉलेजला जात होती. यावेळी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळेने प्राध्यापिकेला वाटेत अडवले त्यांच्यात वाद झाला. राग अनावर झाल्याने आरोपीने प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं. पिडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरण न्यायालयात गेले असून काही दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष सुनावणीस सुरुवात झाली आहे. या प्रकरणात हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयत काही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. बुधवारी पिडितेच्या आई-वडिलांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली आहेत. उर्वरित साक्षीदारांची साक्ष पुढील तारखेस नोंदवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

आरोपी विक्की हा घटनेच्या काही दिवसांपूर्वी पासून पिडित तरुणीचा पाठलाग करत होता. पिडित तरुणीला माझ्याशी लग्न कर नाहीतर खून करेल अशी धमकी आरोपीने दिली होती. असे साक्ष देताना पिडित प्राध्यापिकेच्या आईला अश्रू अनावर आले होते. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने न्यायालयाचे कामकाज १० ते १५ मिनिट स्थगित करण्यात आले होते. न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्याने त्यांची उलटतपासणी करण्यात आली. न्यायालयाने १६ ते १७ फेब्रुवारी अशी सलग तारीख सुनावणीसाठी दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे आठ साक्षदारांची साक्ष पूर्ण झाल्याची माहिती विशेष सकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -