घरताज्या घडामोडीहिंगणघाट जळीतकांड - 'ते असं काही करतील, वाटलं नव्हतं - आरोपीची पत्नी

हिंगणघाट जळीतकांड – ‘ते असं काही करतील, वाटलं नव्हतं – आरोपीची पत्नी

Subscribe

पीडित प्राध्यापिकेसाठी पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

” ते असं करतील असं वाटलं नव्हतं, त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा तरी विचार करायला हवा होता. ” प्राध्यापिका जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्या पत्नीने ही प्रतिक्रिया दिली आहे. घटना घडली त्या दिवसाच्या आदल्या रात्री ते प्रचंड अस्वस्थ होते. ते सारखे घराबाहेर जात होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होते. सकाळी उठून ते कामाला जातील म्हणून मी त्यांच्यासाठी डबा करून दिला. मात्र, ते काहीही न सांगता घराबाहेर पडले आणि काही वेळातच या घटनेची माहिती मिळाली. मात्र, त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता.’ असंही पत्नीने सांगितलं.

पीडितेसाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे –

वर्धामध्ये घडलेला जळीतकांड हा एकतर्फी प्रेमातून घडला आहे. या घटनेत ती प्राध्यापिका ४० टक्के होरपळली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात कोळशासारखा भाजला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून पुढील ४८ तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत आहे. कृत्रिम नलिका टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला आहे. पण, अजून धोका टळलेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं. त्यामुळे अतिशय काळजी घ्यावी लागते.

- Advertisement -

आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी –

आरोपी विकेश नगराळे याला हिंगणघाटच्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला रात्रभर समुद्रपूर पोलिस ठाण्यात ठेवले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला होता.

हिंगणघाट जळीतकांड घटनाक्रम –

  •  सोमवारी सकाळी ७.१५ वाजता हिंगणघाटच्या नंदोरी चौकात तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
  • सकाळी ७.३० वाजता जिल्हा उपरुग्णालयात उपचारार्थ दाखल
  • सकाळी ७.४५ वाजता काही पोलिस उपरुग्णालयात व नंदोरी चौकातील घटनास्थळी दाखल
  • सकाळी ८.१५ वाजता तरुणीला उपचारार्थ नागपूर येथे हलविले
  • शहरात घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली
  • अकरा वाजता काँग्रेसच्या युवकांचा शहरातून मोर्चा
  • शाळा – महाविद्यालयाचे विध्यार्थी एकापाठोपाठ रस्त्यावर
  • बारा वाजता युवकांचा पोलिस ठाण्याला घेराव
  • महिला व विध्यार्थिनी पोलिस ठाण्यावर मोर्चा
  • दुपारी ३ वाजता आरोपीला टाकळघाट येथे अटक
  • बुट्टीबोरी पोलिसांनी आरोपीला केले हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन
  • पाच वाजता सर्वपक्षीय मोर्चा काढून निषेध
  • मंगळवारी सकाळी ७ वाजतापासून शहरात बंदला सुरुवात
  • शहरात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त बंद
  • काँग्रेसच्या युवकांचा मोर्चाला सुरुवात
  • अकरा वाजता सर्वपक्षीय मोर्चाला नंदोरी चौकातून सुरुवात
  • बारा वाजता महिलांचा पोलिस स्टेशनला घेराव
  • काही मोर्चेकरांची उपविभागीय कार्यालयावर धडक
  • मोर्चात महिला, विद्यार्थीनी व सर्वपक्षीय लोकांचा सहभाग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -