घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; विजेच्या तारांना पकडून संपवलं जीवन

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; विजेच्या तारांना पकडून संपवलं जीवन

Subscribe

हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाने घरातच विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सुसाइड नोटदेखील लिहून ठेवलेली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हिंगोली: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. काही भागांमध्ये आंदोलने केली गेली, तर काही भागात तोडफोडीच्या घटना घडल्या. हे आंदोलन थांबलं मात्र, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत.  (Hingoli Another youth commits suicide for Maratha reservation Ended life by catching electricity wires)

हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाने घरातच विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सुसाइड नोटदेखील लिहून ठेवलेली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील 27 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. आदित्य राखोंडे असं मयत युवकाचं नाव असून, तो उच्चशिक्षित होता. मात्र, असं असताना नोकरी मिळत नसल्यानं तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता.

सुसाइडनोटमध्ये काय लिहिलंय?

एक मराठा लाख मराठा… मी सतत बातम्या पाहत आहे आणि मला असं वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझं उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.

- Advertisement -
सुसाइड नोट
सुसाइड नोट

आत्महत्या न करण्याचं करणार आवाहन 

आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. राज्यातील सर्व मराठा एकजूट व्हावा यासाठी हा दौरा केला जाणार आहे. हा दौरा 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. चौथ्या टप्प्यात विदर्भ, तसंच मराठवाडा आणि कोकण अशा टप्प्यांमध्ये पुढचा दौरा असणार आहे. तसंच, यावेळी त्यांनी मराठा समाला आवाहन केलं आहे की, कोणीही आरक्षणासाठी आत्महत्या करु नये. मराठा समाजाला आरक्षण मिळणार, असं जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात जो दौरा ते करणार आहेत त्याद्वारे ते आत्महत्या न करण्याचं आवाहन मराठा समाजाला करणार आहेत.

(हेही वाचा: राष्ट्रवादी फुटीनंतर पहिलीच दिवाळी; अजितदादा पवार कुटुंबीयांसोबत गोविंद बागेत राहणार उपस्थित? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -