घरमहाराष्ट्रHingoli Farmers : "जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत...", मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांची स्पष्ट...

Hingoli Farmers : “जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत…”, मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांची स्पष्ट भूमिका

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (ता. 01 डिसेंबर) मातोश्री निवासस्थाना हिंगोली आणि वाशिम येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भेट घेतली. हे तेच शेतकरी आहेत जे मुंबईत अवयव दानासाठी आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. कर्जबााजारी असलेल्या या शेतकऱ्यांनी आपले स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले. त्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला. सरकारने आपले अवयव विकत घेऊन कर्जमाफी करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली. परंतु, त्यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रसार माध्यमांसमोर शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत काय नेमके घडले याबाबतची संपूर्ण हकीकत सांगितली आहे. तसेच या शेतकऱ्यांनी यावेळी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. (Hingoli Farmers : “Until there is a loan waiver…”, a clear stance of the farmers who came to Mumbai)

हेही वाचा – “सरकारकडून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न…”, उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितली आपबीती

- Advertisement -

आजच्या पत्रकार परिषदेत हिंगोली येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी दिली होती. माझी कर्जमाफी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली होती. त्यानंतर मी दोन लाखांचे कर्ज काढले होते. हे कर्ज काढल्यानंतर आज माझ्यावर दोन लाखांचे 3 लाख 25 हजार कर्ज झाले आहे. बँकेकडून 11 टक्के व्याडज लावण्यात आले आहे. सरकारने सांगितले होते की 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देऊ. पण आमच्या खात्याला 11 ते 12 टक्के व्याज लावले जात आहे. गावागावात आज खासगी फायनान्सचा एवढा त्रास झाला आहे की आमच्या बहुतांश शेतकऱ्यांची घरे खासगी फायनान्सकडे गहाण आहेत. यानंतर आमच्यावर बँकेच्या कर्जाचा बोझा एवढा चढला तो एवढा मोठा झाला की, त्याचे ओझे आम्हा सर्वांना सहन करणे कठीण झाले होते. आम्ही 10 शेतकरी आहोत. ज्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण कोणीतरी आपली दखल घेईल म्हणून आम्ही आत्महत्या न करता आमचे अवयव विक्रीला काढले होते, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

तर, आम्ही 4 दिवसांपासून उपाशी आहोत. चार दिवसांत साध्या तलाठीने देखील विचार केला नाही. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनी धीर दिला आणि सरकारने दडपशाही केली. जोपर्यंत आमचे कर्जमाफ होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. यांचा पीकविमा नाही. यांचे दुष्काळी अनुदान नाही, यांच्या जाचक अटी, आम्ही 75 टक्के शेतकरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार काळात पात्र झालो नाहीत. उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात पात्र ठरलो. तसेच, गेल्यावर्षी सरकारने आयसीसी लोम्बार्ट नावाच्या कंपीनेने 1 हजार, 2 हजार, 500 रुपये विमा दिला. एका शेतकऱ्याला तर 1 रुपये विमा दिला. मागच्या वर्षी त्यांनी 3 हेक्टरची मर्यादा ठेवली. 13 हजार 600 रुपये जाहीर केले. तीन हेक्टरला 40 हजार 800 रुपये शेतकऱ्यांना मिळायला हवे होते. पण आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना 2 हजार ते 5 हजार रुपये इतकीच मदत मिळाली, अशी धक्कादायक माहिती शेतकरी नामदेव पतंगे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -