घरक्राइमअनिल जयसिंघानीला लपवण्यात होता 'याचा' हात, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अनिल जयसिंघानीला लपवण्यात होता ‘याचा’ हात, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Subscribe

Anil Jaisinghani News | या ऑपरेशनमध्ये अनिल जयसिंघानी याने पोलिसांना जवळपास ७२ तास गुंगारा दिला. अखेर, गुजरात पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. त्याचा ताबा मलबार हिल पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

Anil Jaisinghani News | मुंबई – अमृता फडणवीस लाच प्रकरणी आंतरराष्ट्रीय बुकी अनिल जयसिंघानी याला अटक केल्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानीला लपवण्यात आणि लॉजिस्टिक सपोर्ट करण्यात निर्मल जयसिंघानी मदत करत होता. त्यामुळे पोलिसांनी काल गुजरातमधून अटक केली आहे. दरम्यान, आज या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा दुसऱ्यांसाठी खड्डे खणणारेच…, अनिल जयसिंघानीप्रकरणी भाजपाचा ठाकरेंवर निशाणा

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई गुन्हे शाखेने गुजरातहून अटक केली आहे. या अटकेचा थरार मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषदेत विषद केला. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त, गुन्हे लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमध्ये ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनमध्ये अनिल जयसिंघानी याने पोलिसांना जवळपास ७२ तास गुंगारा दिला. अखेर, गुजरात पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. त्याचा ताबा मलबार हिल पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून पत्रकार परिषद घेऊन या अटकेची माहिती देण्यात आली.

हेही वाचा – गुजरातमध्ये ७२ तास रंगला अटकेचा थरार, मुंबई गुन्हे शाखेने ‘असे’ पकडले अनिल जयसिंघानीला

- Advertisement -

गुन्हे शाखेने सहआयुक्त गुन्हे यांच्या नेतृत्त्वाखाली पाच पथके तयार केली होती. सायबर गुन्ह्यांची तीन पथके, सीआयूचे १ पथक आणि गुन्हे शाखा युनिट १० चे १ पथकाचा यात समावेश करण्यात आला होता. अनिल जयसिंघानी गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या शोधासाठी हे पाचही पथक विविध राज्यात तपासासाठी पाठवण्यात आली होती. या तपासादरम्यान पोलिसांना सुगावा लागला. आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अनिल जयसिंघानी महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बारदोली येथे पोहोचल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे तीन पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत पोलीस, सुरत ग्रामीण पोलीस, गोध्रा, बरोच, बडोदरा पोलिसांशी समनव्य करून ऑपरेशन गुजरातमध्ये राबवले. हा आरोपी ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. तो बारदोली येथे कसल्याची माहिती मिळाली म्हणून पोलीस तेथे पोहोचले. पण तो तेथून निसटला. आरोपी नंतर सुरतमध्ये गेला, तिथेही पोलिसांनी सापळा रचला, परंतु, तो तिथूनही पोलिसांच्या हातून निसटला. पोटदारा, भरोच, वडोदरा या मार्गे तो गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना ७२ तासांच्या थरारानंतर रात्री पावणे बाराच्या सुमारास नाकाबंदी करून गोध्राजवळील कलोल येथे गुजरात पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या, असा थरार गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -