घरमहाराष्ट्रपुन्हा इतिहास रुजवावा लागेल, जागवावा लागेल; प्रसाद लाडांवर अमोल कोल्हे भडकले

पुन्हा इतिहास रुजवावा लागेल, जागवावा लागेल; प्रसाद लाडांवर अमोल कोल्हे भडकले

Subscribe

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. गेल्या काही दिवसांत भाजपाच्या अनेक नेत्यांनी बेताल वक्तव्य केल्याने विरोधकांनी आधीच त्यांना घेरलं आहे. त्यातच, प्रसाद लाड यांचं वक्तव्य आल्याने अमोल कोल्हेंनी भाजपाला टार्गेट केलं आहे. आता पुन्हा इतिहास रुजवावा लागणार, जागवावा लागणार, असं राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले आहेत.


स्वर्गभूमी कोकण महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माची चुकीची माहिती दिली. आपली चूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली. परंतु, इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी शिकवलेली माहिती कोण कसं विसरू शकेल अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे. त्यातच, राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रसाद लाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवरायांवरून भाजपाचा नेता पुन्हा बरळला, म्हणे महाराजांचा जन्म कोकणातला!

“काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा?
टीपः- हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे.. निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार!,” असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर मी दिलगिरी व्यक्त करतो, प्रसाद लाडांकडून माफीनामा नाहीच

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय, त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणालेत. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -