घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंकडे काय कला आहे देवाला माहीत, त्यांनी आमचाही एक आमदार फोडला...

एकनाथ शिंदेंकडे काय कला आहे देवाला माहीत, त्यांनी आमचाही एक आमदार फोडला – हितेंद्र ठाकूर

Subscribe

अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे आम्ही आयुष्यात कधीही म्हणणार नाही!, अस म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निधी वाटपाबाबत केलेले आरोप फोडून काढले आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापने केलेल्या सरकारने सोमवरी विधानसभेत बहुमताचा ठराव जिंकला. बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बहुजन विकास आघाडीचे आमदार  हितेंद्र ठाकूर यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी संघटना वाढवण्यासाठी बऱ्याच लोकांना झटके दिले आहेत. २०१९ च्या विधानसभेच्या अगोदरही त्यांनी बरेचसे आमदार घेतले त्यात आमचाही आमदार घेतला. असा टोला ठाकूर यांनी लगावला आहे.

“एकनाथ शिंदे यांनी संघटना वाढवण्यासाठी बऱ्याच लोकांना झटके दिले. २०१९ च्या विधानसभेच्या अगोदरही बरेचसे आमदार घेतले त्यात आमचाही आमदार घेतला. काय तुमचं कसब असे? काय कला आहे देवाला माहित पण घेतला. त्याबद्दल काही दु:ख नाही…प्रत्येक पक्ष हे धंदे करतो उपद्व्याप करतो.. त्यामुळे त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण आत्ता एकत्र आहे.. प्रश्नच नाही…” अशा शब्दात ठाकूरांनी एकनाथ शिंदे यांना चिमटे काढले आहेत.

- Advertisement -

“यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकूरांकडे पाहून हाताने आपण एकत्र असल्याचे दाखवत होते. यावर ठाकूर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेले देवेंद्र फडणवीस गोड बोलतात आणि तेच काम (फोडाफोडीचे) करतात. वेगळं करतात अशातला भाग नाही. जो जो आपली संघटना वाढतो हा अधिकार आहे”, असा टोला लगावला. ठाकूरांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकचं हशा पिकला.

“चांगल्या भाषेत बोलता येऊ शकणाऱ्या गोष्टी. घोडेबाजारापासून या महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या चर्चा झाल्या त्या दुर्देवी आहेत. मागे एकदा मी याच सभागृहात छाती ठोकपणे बोललो शिवसेनेला मत दिले, काँग्रेसला मत दिले, राष्ट्रवादीला मत दिले. मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख केलेला की त्यांच्या सांगण्यावरून सदस्य धनंजय मुंडे यांना मत दिले आहे… आजपर्यंत कोणी शिंतोडे उडवू शकले नाही आरोप करु शकलं नाही. पण दुर्देवाने ते सगळे आरोप आज झाले. अशावेळी या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे आले.. सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या, शुभेच्छा दिल्या”,अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

अजितदादांनी पैसे दिले नाहीत, असे आम्ही आयुष्यात कधीही म्हणणार नाही!

“अजित पवार यांची भाषाशैली वेगळी आहे, बोलणं वेगळं आहे. दादांनी आज खुलासा केला, तुमच्या बद्दल कोणीच बोलणार नाही ती तुम्ही काम केलं नाही, तुम्ही पैसे दिले नाही आम्ही आयुष्यात बोलू शकत नाही. काही ठिकाणी काही वेळा एखाद्या व्यक्तीवर आरोप होतात. काही तरी दुसर केलं जात”, अशा शब्दात बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निधी वाटपाबाबत केलेले आरोप हितेंद्र ठाकूर यांनी फोडून काढले.

“सत्ता येत जाते, पण तुम्ही एखाद्यासोबत कशाप्रकारे संबंध ठेवता कशाप्रकारे वागता…. आज कोणीतरी सत्तेवरून पाय उतार झाला त्याबद्दल काही तरी बोलणं ते माणूसकीला किंवा राजकारणाला धरून नाही. कधी काय होईल… इथे सगळ्यांनी काम केलं… पण तुम्ही कसे वागता, समाजामध्ये कसे राहता लोकांशी कसे वागता, कशाप्रकारे काम करता…. मी एकनाथ शिंदेंना एवढचं सांगेन की तुम्ही अग्रेसिव्हपणे संघटना वाढवली तुमचं कर्तव्य होते”, असही हितेंद्र ठाकूर म्हणाले.

“पण तुम्ही एकनंबरच्या खुर्चीवर बसल्यानंतर तुमची संघटना सरकार यातील फरक करा. संघटना ही एक असते आणि सरकार हे तुम्हाला वेगळ्या प्रकारची लोक, वेगळ्या विचारसरणीची लोकं, जाती धर्माची लोकं एकत्र घेऊन जायची आहेत आणि प्रशासनातील लोकं एकत्र घेऊन जायची आहेत. या सगळ्यांना बांधून सगळ्यांनी एकत्र घेऊन राज्य करायचे आहे. एक संघटना म्हणून कधीही राज्य चालवता येत नाही”, त्यादृष्टीने ते सगळ्यांना न्याय देतील ही खात्री बागळत असल्याचे ठाकूर म्हणाले.

“मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही रिंग रोड, पायाभूत सुविधांवर जोर दिला, आमची विनंती रहिल पण तुमच्यावर आमची नाराजीपण आहे. आमचा जिल्हा वेगळा झाला, आमचे त्यावेळचे जिल्हाधिकारी तुमच्यासोबत राहिले. थोडा आमच्यावर अन्याय केला काय दादा. माझ्याकडे सगळ्याचा हिशोब आहे तुम्ही मंत्री म्हणून काय केलं त्याचा. युडी खात्यातून आणि दादा तुम्हीपण पालमंत्री म्हणून लक्षात आलं की नाही”,अशा शब्दात ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.

“भविष्यात राजकारणात चालत असते. पण भविष्यात आम्हाला न्याय द्या.. वसई तालुक्याचा भाग आहे जो जगातला अॅबनॉर्मल लोकसंख्या वाढीचा भाग आहे. कार परवडणाी घरी, कनेक्टीव्हिटी म्हणजे गुजरातला वापी साईडला जाणारा देखील मुंबईला येणारा असेल, ठाण्याला जाणारा असेल यांची रोडची रेल्वेची कनेक्टिव्हिटी वेगळ्या पद्धतीने आहे. त्यामुळे जो भार पडतोय तो फार मोठ्या प्रमाणात पडतोय, अशावेळी तुमच्याकडे युडीमध्ये असताना एमएसआरडीसी, एमएमआरडीए होतं. उद्याला आपल्याच राज्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी बोलून पायाभूत सुविधांसाठी काम करता येईल”, असा आशा ठाकूरांनी व्यक्त केली.


आम्ही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गायी किंवा दावणीला बांधलेले आमदार नाही, हितेंद्र ठाकूरांचे राऊतांना प्रत्युत्तर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -