आमची भूमिका १० तारखेला जाहीर करू, हितेंद्र ठाकूरांनी वाढवले शिवसेना आणि भाजपचे टेन्शन

तीन आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीला आता कमालीचे महत्त्व आले आहे. या पक्षाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यांची ३ मते कुणाला मिळणार हे अद्याप उघड न झाल्याने  शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली.

Hitendra Thakur has also received a call from the Chief Minister

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi) आणि भाजपाकडून (BJP) हालचाली आता तीव्र झाल्या आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik) आणि शिवसेनेचे (Shiv Sena ) संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यात लढत आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांवर दोन्ही उमेदवारांची मदार आहे. त्यामुळे या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी आम्ही आमची भूमिका १० तारखेला जाहीर करू असे म्हटल्याने दोन्ही उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

तीन आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीला आता कमालीचे महत्त्व आले आहे. या पक्षाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यांची ३ मते कुणाला मिळणार हे अद्याप उघड न झाल्याने  शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. हितेंद्र ठाकूर यांनी नुकतेच मी महाविकास आघाडीवर शंभर टक्के खूश नाही असे म्हटले होते. त्यानंतर भाजप उमेदवार धनंजय महाडिक सर्वात आधी हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी जवळपास चार तास चर्चा झाली. मात्र बैठकीत नक्की काय बोलणे झाले हे बाहेर आले नाही.

आता हितेंद्र ठाकूर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आमचे तिन्ही आमदार एकत्र बसून चर्चा करतील. आमचे प्रश्न केंद्रातील सरकार की राज्यातील सरकार सोडवणार यावर विचार करण्यात येईल. त्यानंतर 10 तारखेला कोणाबाहेर जायचे हे आम्ही सांगू, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

मागील शनिवारी धनंजय महाडिक यांनी विरार येथे जाऊन  हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी दोन तास धनंजय महाडिक, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्यात चर्चा झाली. यावेळी निरोप घेताना ‘हम सब साथ है’ असे म्हणत महाडिक यांनी आपल्या पक्षाची मते देण्याची विनंती केली.