घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह, अमरावती दंगलीवर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

परमबीर सिंह, अमरावती दंगलीवर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमीबर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. तर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय आणि अराजकीय घडामोडी घडत आहेत. अमरावतीमध्ये हिंसाचार, गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा खात्मा, महागाई अशा सर्वच विषयांवरुन महाराष्ट्र अशांतता निर्माण झाली आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. महाराष्ट्र आणि राज्य सरकारला परमबीर सिंह यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा थेट उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील सर्व घडामोडींवर उत्तरे दिली आहेत. यामध्ये परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र बदनाम करण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर गृहमंत्री म्हणाले की, सिंह यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. ते एका आयुक्त पदावर राहिलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र बदनाम करण्यासाठी वक्तव्य केल्याचा संशय निर्माण झाला आहे. परमबीर सिंह सापडत नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. ते कुठे आहेत समजले असते तर त्यांना ताब्यात घेतलं असते.

- Advertisement -

माओवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही तयार

गडचिरोली सीमाभागात माओवाद्यांशी, नक्षलवाद्यांशी नेहमी सामना होत असतो. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांना जंगलात हालचाली होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गस्त वाढवण्यात आली होती. गस्तीच्यावेळी गोळीबार करण्यात आला याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देत माओवाद्यांचा खात्मा केला आहे. अशा घटना घडत असतात परंतु आम्ही नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले

महाराष्ट्रातील दंगलीवर चौकशी सुरु

अमरावतीमध्ये झालेल्या दंगलीची माहिती नव्हती का? या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील गुप्तचर यंत्रणांना या मोर्चा आणि बंदबाबतची माहिती मिळाली होती. परंतु दंगल घडेल आणि हिंसाचार वाढेल अशी कल्पना नव्हती. परंतु दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांवरुन महाराष्ट्रात अशा घटना घडणे हे अशोभनीय आहे. महाराष्ट्रातील हिंसा, दंगलीची चौकशी सुरु आहे. चौकशी पुर्ण झाल्यावर दोषींवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची वळसे पाटील यांनी सांगितले. या कारवाईत जर रझा अकादमी दोषी सापडली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दरम्यान या दंगलीच्या अहवालात युवा सेनेचे नाव आले असल्याचे गृहमंत्र्यांना विचारले त्यावर कोण नेता आणि कोणता पक्ष महत्वाचा नाही तर जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल असे गृहमंत्री म्हणाले.

- Advertisement -

फडणवीसांच्या आरोपांशी सहमत नाही

अमरावतीमधील दंगलीला महाराष्ट्र सरकारचे समर्थन असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर फडणवीसांच्या आरोपात तथ्य नाही. राज्यातील नेते राज्य सुरळीत चालण्यासाठी काम करत असतात त्यामुळे फडणवीसांच्या आरोपांशी समहत नाही असे गृहमंत्री म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी असे वक्तव्य का केले याची माहिती नाही परंतु आम्ही याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

अमरावतीची परिस्थिती सुधारतेय

अमरावतीमध्ये कोणत्याही मोर्च्याला परवानगी देण्यात आली नव्हती. मोर्चा काढून धार्मिक विषयांवरुन लोकांना भडकवण्यात आले. यामधून हिंसाचार निर्माण झाला. सध्या अमरावतीमध्ये संचारबंदी लागू असून परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दंगल घडवण्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे याचा पत्ता चौकशी पुर्ण झाल्यावर लागेल परंतु जो कोणी चौकशीत दोषी सापडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -