घरमहाराष्ट्रपवारांची समाजकारणातील अन् राजकारणातील भूमिका सगळ्यांना माहिती, दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

पवारांची समाजकारणातील अन् राजकारणातील भूमिका सगळ्यांना माहिती, दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची राजकारणामधील आणि समाजकारणातील भूमिका सगळ्यांना माहिती आहे. यामुळे ट्विट करुन काही फायदा होणार नाही असा पलटवार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. शरद पवार यांच्यावर यापूर्वी सुद्धा दाऊदशी कनेक्शन असल्याचा आरोप झाला आहे. तसेच नवाब मलिकांची केस फार जुनी आहे. दाऊदशी संबंध नसताना ओढून ताणून संबंध जोडण्यात आला असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले आहेत. राज्यातील जातीयवादावरुन फडणवीसांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.यावर वळसे पाटलांनी पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला राष्ट्रवादी नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लागोपाठ १४ ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच शरद पवार यांच्या भूमिकेवर सवाल केला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांच्या ट्विटवर पलटवार केला आहे. शरद पवार यांच्या राजकारणातील आणि समाजकारणातील ज्या भूमिका आहेत. त्या भूमिका वर्षानुवर्षे लोकांना माहिती आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ट्विट करुन त्याचा काही फायदा होईल असे वाटत नाही असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

यापूर्वीसुद्धा थेट शरद पवारांचे दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न

कलम ३७० बाबतची जी भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचे वळसे पाटील म्हणाले आहेत. तसेच नवाब मलिकांच्या कारवाईबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले ही काय नवीन बाब नाही. यापूर्वीच्याकाळात अशाच प्रकारे झालं आहे. नवाब मलिकांची केस पीएमलएलए कायदा येण्यापूर्वीची केस आहे. इतकी जुनी केस काढून त्याच्यामध्ये कोणताही व्यवहार दाऊदशी किंवा संबंध नसताना ओढून ताणून संबंध जोडायचा, यापूर्वीसुद्धा थेट शरद पवारांचे संबंध अशाच प्रकारे जोडण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. त्यामुळे यामध्ये काही तथ्य दिसत नाही असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

मुस्लिम समजाला शैक्षणिक आरक्षण नाकारलं

मुस्लिम आरक्षणाचे सोडा कोर्टाने जे सांगितले आहे, शैक्षणिक आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय असतानासुद्धा मागच्या काळात मुस्लिम समजाला शैक्षणिक आरक्षण नाकारलं आहे. भारत हा वेगवेगळ्या जातीचा धर्माचा, वेगवेगळ्या लोकांनी जोडलेला देश आहे. आजही भारत अखंड असून अखंडच राहील. त्याचे विघटन करण्याचा प्रयत्न करु नये. तसेच सोमय्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. यावर वळसे पाटील म्हणाले, हा एक आश्चर्याचा प्रश्न आहे. विशिष्ट पक्षातील लोकांनाच जर दिलासा मिळायला लागला आणि इतर पक्षातील लोकांना मिळत नाही. अशी प्रकरणं समोर असल्यामुळे सहज कोणाच्याही मनात विचार येईल. त्यामध्ये काही चुकीचे नाही असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मनसेला माफी मागावी लागेल

शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. जेम्स लेनने पुस्तक मागे घ्यावे असे पत्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिले होते असे मनसेने म्हटलं आहे. यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मनसेला अशा प्रकारची माफी अनेकवेळा मागावी लागेल शरद पवार यांनी माफी मागावी याचा प्रश्नच येत नाही.

याच्याबाबत मी स्पष्टपणे सांगतो की, ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, तो न्यायालयीन निर्णय असा आहे की ज्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावू शकत नाही. यासाठी न्यायालयाने आवाजाची क्षमता ठरवून दिली आहे. न्यायालयाने कुठल्याही मंदिरावरचे किंवा मशिदीवर परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढण्याचा निर्णय दिला नाही.


हेही वाचा : जातीयवादावरुन फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा, १४ ट्विटमध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट ते काश्मीर फाईल्सचा संदर्भ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -