पोलिसांच्या बदल्यांची ती यादी खोडसाळपणाने व्हायरल, गृहमंत्री वळसे पाटलांकडून चौकशीचा आदेश

राज्य सरकारमध्ये ६ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एक यादी व्हायरल झाली होती. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते.

hmo dilip walse patil said viral police transfer list is fake will order enquiry
पोलिसांच्या बदल्यांची ती यादी खोडसाळपणाने व्हायरल, गृहमंत्री वळसे पाटलांकडून चौकशीचा आदेश

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यातील पोलीस दलात अनागोंदी कारभार सुरु असल्याचे याअगोदरही समोर आले आहे. आता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पोलीस बदल्यांच्या नावाची जी यादी व्हायरल झाली आहे ती चुकीची असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच बदल्यांची यादी खोडसाळपणाने व्हायरल करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. बदल्यांबाबत राज्य सरकारकडे कोणताही प्रस्ताव आला नाही आहे.

राज्यातील पोलीसांच्या बदल्या करण्यात आली असल्याची यादी व्हायरल होत आहे. समाजमाध्यमांवर या व्हायरल झालेल्या यादीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही देखील नाही. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वळसे पाटील म्हणाले की, सध्या बदल्यांचा कोणताही प्रस्ताव नाही. ती जी लिस्ट व्हायरल झाली आहे. ती पूर्णपणे चुकीची असून खोडसाळपणाने करण्यात आली आहे. याची चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारमध्ये ६ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एक यादी व्हायरल झाली होती. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. तसेच वर्षापूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजासारखा आवाज काढून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना केली होती. परंतु अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करण्यात आला होता. यानंतर अज्ञात व्यक्तीने फोन केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याची यादी कोणी व्हायरल केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नावाची यादी व्हायरल करण्यात आली असल्यामुळे प्रशासनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वचक आहे की नाही? असा प्रश्न करण्यात येत आहे.


हेही वाचा : शरद पवार पंतप्रधान होणार का?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर संजय राऊतांचे रोखठोक उत्तर