घरताज्या घडामोडीमंदिराना टाळे मदिरालयात छमछमचे धुमशान, वळसे पाटलांच्या कानउघडणी नंतर पोलीस आयुक्तांना जाग

मंदिराना टाळे मदिरालयात छमछमचे धुमशान, वळसे पाटलांच्या कानउघडणी नंतर पोलीस आयुक्तांना जाग

Subscribe

नवी मुंबईच्या गायकवाडची ठाणे जिल्ह्यात वसुली मोहीम?

मागील दोन-तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असताना आणि संपूर्ण जिल्हा महापुराने जलमय झाला असतानाच या महापुरात ही ठाणे जिल्ह्यातील डान्स बार मध्ये पहाटेपर्यंत छय्या छय्या चा धुमाकूळ सुरू असल्यास ची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या रुद्रावतारानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे पोलीस आयुक्त अजित सिंग यांनी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन सहाय्यक पोलीस आयुक्त यांची उचलबांगडी करून त्यांना कंट्रोल ला पोस्टिंग दिली आहे. दोन्ही पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे विवेक फणसाळकर यांच्याकडे असेपर्यंत ठाणे जिल्ह्यातील डान्स बार मालकांवर वचक आणि दरारा होता मात्र त्यांच्या बदलीनंतर थंडावलेल्या डान्सबार व्यवसायाने ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा उचल घेतली असून पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर ती छय्या छय्या सुरू झाले आहे. ठाणे शहरातील पहाटेपर्यंत सुरू असलेल्या डान्सबार बाबत थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडेच पुराव्यानिशी तक्रारी गेल्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांची कानउघडणी केल्याची चर्चा असून त्यानंतर जागे झालेल्या आयुक्तांनी याप्रकरणी ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांची कंट्रोल रूमला उचलबांगडी केली आहे.

- Advertisement -

नवी मुंबईच्या गायकवाडची ठाणे जिल्ह्यात वसुली मोहीम?

ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये ठाण्यापासून ते कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि भिवंडी एवढ्या मोठ्या क्षेत्राचा समावेश होतो. सचिन वाजे प्रकरणानंतर सजग झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयातील वसुलीच्या मोहिमेची सूत्रे नवी मुंबईतील गायकवाड नावाच्या एका पोलीस निरीक्षकाच्या हाती सोपवली असल्याची बार मालक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. हे गायकवाड महाशय गृह खात्यातील गायकवाड नावाच्या अधिकाऱ्याशी नातेसंबंधात असल्याचेही सांगितले जाते. आयुक्तालय क्षेत्रातील डान्सबार, लॉजिंग, बेटिंगचे अड्डे, मटका जुगार तसेच सर्व अनैतिक व्यावसायिकांकडून कोट्यावधींची वसुली गायकवाड मार्फत केली जात आहे. त्यामुळे राज्याचे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे वसुली ब्रिगेड गायकवाड याच्यावर कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत गायकवाड यांच्या माध्यमातून 30 कोटींच्या वर वसुली झाल्याची चर्चा असून त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्या आणि बदल्या याचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.

गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई

सोमवारी १९ जुलै रोजी सायंकाळी एका खासगी मराठी न्युज चॅनेलवर बार चालू असल्याची बातमी दाखविण्यात आली होती. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्‍त, ठाणे शहर यांचे आदेशान्वये अपर पोलीस आयुक्त, पश्‍चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाब आदेश दिले होते. या नुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी मांगळे यांना व वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भिकू गायकवाड यांना निलंबित करून मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले आहे. नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुकत श्रीमती निता अशोक पाडवी व वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज नवनाथ शिरसाट यांना नियंत्रण कक्ष ठाणे येथे संलग्न करण्यात आले आहे.

- Advertisement -

संबंधित ऑर्केस्ट्रा बार अँण्ड रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेस उपरोक्त बातमीतील नमुद ऑर्केस्ट्रा बार अण्ड रेस्टॉरंट सिलबंद करण्याची कारवाई करणेबाबत कळविण्यात आले आहे. तसेच ठाणे अबकारी विभागास नमुद ऑर्केस्ट्रा बार अँण्ड रेस्टॉरंटवर कारवाई करणेबाबत कळविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -