Homeमहाराष्ट्रHMPV in Nagpur : नागपुरातून महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, दोन लहानग्यांचा रिपोर्ट...

HMPV in Nagpur : नागपुरातून महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, दोन लहानग्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Subscribe

नागपुरातील एका 13 वर्षाच्या मुलीला आणि 07 वर्षाच्या मुलाला ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही लहानग्यांना या व्हायरसचे 03 जानेवारीलाच निदान झाले होते.

नागपूर : कोरोनानंतर आता HMPV म्हणजेच ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसने डोके वर काढले आहे. या व्हायरसमुळे चीनधील रुग्णालयात पुन्हा गर्दी पाहायला मिळत आहे. ज्यामुळे जगातील इतर देशांना चिंता सतावू लागली आहे. याकरिता भारत सरकारने सुद्धा विशेष उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पण हा व्हायरसचा सोमवारीच (ता. 06 जानेवारी) भारतातसुद्धा शिरकाव झाला. सोमवारी भारतात बंगळुरू, गुजरातमध्ये तीन रुग्ण आढळून आले. त्यानंतर आता आज मंगळवारी (ता. 07 जानेवारी) महाराष्ट्रात सुद्धा या व्हायरसचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरात ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. (HMPV in Nagpur report of two cases positive)

नागपुरातील एका 13 वर्षाच्या मुलीला आणि 07 वर्षाच्या मुलाला ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही लहानग्यांना या व्हायरसचे 03 जानेवारीलाच निदान झाले होते. दोघांचाही HMPV चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणे दिसून आली होती. या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही. पण हे दोन्ही रुग्ण आता या व्हायरसमधून बरे झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी या दोघांनाही HMPV ची लागण झाल्याचे समोर आले होते, त्यावेळी दोघांनाही योग्य औषधोपचारानंतर घरी पाठवण्यात आले.

हेही वाचा… Mumbai : देशभरात HMPV चे 3 रुग्ण; पण मुंबईत एकही रुग्ण नाही

महाराष्ट्र अलर्ट मोडवर…

एचएमपीव्हीसंदर्भात अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभागाने नागरिकांसाठी परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागही याबाबत अलर्ट मोडवर आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका, असे सांगण्यात आले आहे. तर, साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या, असे म्हटले आहे.