घरट्रेंडिंगनिरुपमांना परप्रांतियांचा पुळका; मनसेने दिला दणका

निरुपमांना परप्रांतियांचा पुळका; मनसेने दिला दणका

Subscribe

मनसेने व्यंगचित्राच्या माध्यमातून संजय निरुपम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनसेने व्यंगचित्रामध्ये निरुपमांना 'परप्रांतियांचा भटका कुत्रा' असं संबोधलं आहे.

एकीकडे आगामी निवडुणकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे पक्षीय बैठकीत राजकीय नेत्यांनी आपापल्या व्होट बँकेला चुचकारायला सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी नागपूरमध्ये उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना अशाचप्रकारे त्यांचं कौतुक केलं आहे. ‘उत्तर भारतीय लोक मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी काम बंद केलं तर मुंबई ठप्प होईल’, या त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यंगचित्राच्या माध्यमातून निरुपम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनसेने आपल्या व्यंगचित्रामध्ये संजय निरुपमांना ‘परप्रांतियांचा भटका कुत्रा’ असं संबोधलं आहे. निरुपम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि मनसेने त्यांना दिलेल्या चोख उत्तरामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

व्यंगचित्राच्या माध्यमातून निरुपम यांना हाणला टोला (सौजन्य-सोशल मीडिया)

काय म्हणाले निरुपम?

‘उत्तर भारतीय माणूस महाराष्ट्र आणि मुंबई चालवतो. दूध विकणे, टॅक्सी चालवणे अशी सर्वच कामं उत्तर भारतीय माणूस करतो. उत्तर भारतीय सक्रीय नाहीत असं कोणतंही क्षेत्र सांगा. बांधकाम क्षेत्रातील मजूरांपासून, फळं भाजी विक्रेत्यांपर्यंत बहुतांशी लोक हे उत्तर भारतीयच आहे. उत्तर भारतीयांनी एक दिवस जरी काम न करण्याचं ठरवलं तर, मुंबईकरांना जेवायला मिळणार नाही’, अशाप्रकराची विधानं निरुपम यांनी यावेळी केली. ‘मुंबई बंद पाडण्यास आम्हाला भाग पाडू नका’, असा अप्रत्यक्ष इशाराही निरुपम यांनी यावेळी दिला. उत्तर भारतीय लोक हे राष्ट्रीय मानसिकतेचे असतात. पंतप्रधानांच्या गुजरातमध्येही आज उत्तर भारतीयांवर हल्ला होतो आहे. ‘एक दिवस मोदींनाही वाराणसीला जायचं आहे’, असं वक्तव्यही निरुपम यांनी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -